Crime: तलावात सापडू लागलं सोनं, कोट्यवधी रुपयांमध्ये किंमत, सुरक्षा यंत्रणा अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:09 AM2023-03-07T11:09:24+5:302023-03-07T11:09:51+5:30

Crime News: या तलावमध्ये सोन्याची ४० बिस्किटं सापडली आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत ही २.५७ कोटी रुपये एवढी आहे.

Crime: Gold found in the lake, cost in crores of rupees, security system is speechless | Crime: तलावात सापडू लागलं सोनं, कोट्यवधी रुपयांमध्ये किंमत, सुरक्षा यंत्रणा अवाक्

Crime: तलावात सापडू लागलं सोनं, कोट्यवधी रुपयांमध्ये किंमत, सुरक्षा यंत्रणा अवाक्

googlenewsNext

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यामध्ये बीएसएफने सोमवारी कल्याणी सीमा चौकी क्षेत्रात असलेल्या एका तलावामधून तब्बल २.५७ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत. कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बीएसएफच्या एका पथकाने गोपनीय सूचनेच्या आधारावर सोन्याचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम चालवली होती.  

बीएसएफने सांगितले की, या तलावमध्ये सोन्याची ४० बिस्किटं सापडली आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत ही २.५७ कोटी रुपये एवढी आहे. काही महिन्यांपूर्वी पाठलाग करत असताना एका तस्कराने तलावात उडी घेतली होती. त्यानंतर त्याने तिथेच सोनं लपवलं होतं.

जेव्हा त्याला पकडण्यात आलं. तेव्हा त्याच्याकडे काहीच सापडलं नाही. त्यामुळे आम्ही त्याला सोडून दिलं. मात्र तो लपवलेलं सोनं शोधण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, २०२२ मध्ये बीएसएफच्या साऊथ बंगाल फ्रंटियरने ११३ किलो पेक्षा अधिक सोनं जप्त केलं आहे.   

Web Title: Crime: Gold found in the lake, cost in crores of rupees, security system is speechless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.