अग्रेसर पतसंस्थेच्या चेअरमनवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

By admin | Published: August 8, 2016 12:36 AM2016-08-08T00:36:06+5:302016-08-08T00:36:06+5:30

जळगाव : धार येथील मूळ रहिवासी चेतन देवीदास पाचपोळ या तरूण शेतकर्‍याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अग्रेसर अर्बन सोसायटीचा चेअरमन पद्माकर रामदास अग्रेसर (रा.मधुबन अपार्टमेंट, गणेश कॉलनी रोड) याच्याविरुद्ध रविवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयत चेतनचा चुलत भाऊ उल्हास लखीचंद पाचपोळ (२३, रा.धार, ता.धरणगाव) याने फिर्याद दाखल केली आहे.

The crime of motivating the leading credit society chairman on suicide | अग्रेसर पतसंस्थेच्या चेअरमनवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

अग्रेसर पतसंस्थेच्या चेअरमनवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

Next
गाव : धार येथील मूळ रहिवासी चेतन देवीदास पाचपोळ या तरूण शेतकर्‍याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अग्रेसर अर्बन सोसायटीचा चेअरमन पद्माकर रामदास अग्रेसर (रा.मधुबन अपार्टमेंट, गणेश कॉलनी रोड) याच्याविरुद्ध रविवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयत चेतनचा चुलत भाऊ उल्हास लखीचंद पाचपोळ (२३, रा.धार, ता.धरणगाव) याने फिर्याद दाखल केली आहे.
या फिर्यादीनुसार, मयत चेतनचे वडील देवीदास भगवान पाचपोळ यांनी त्यांचे धार गावातील राहते घर व त्यांच्या आई शांताबाई भगवान पाचपोळ यांच्या धार शिवारातील शेतीवर धनवर्षा अर्बन को-ऑप सोसायटीकडून २००३ मध्ये २३ लाख तर अग्रेसर अर्बन सोसायटीकडून २००६ मध्ये ६५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१० मध्ये देवीदास पाचपोळ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वारसदारांच्या नावे असलेल्या या मिळकतीवर पतसंस्थांनी बोजा चढवला. वारसदारांच्या नावे असलेली गट क्रमांक २७६, २४५, २४५/१ मधील एकूण २४.५ बिगे शेतजमीन पतसंस्थांनी लिलावाद्वारे विकली होती. त्यानंतर गट क्रमांक २५९, २७१ व २४९ वर पतसंस्थांनी बोजा चढवला होता. या मिळकतींवर बोजामुळे पतसंस्था वारंवार वसुलीसाठी नोटिसा बजावत होती. म्हणून चेतनचा भाऊ सागर व आई विजयाबाई पाचपोळ यांनी धार शिवारातील गट क्रमांक २४५ ची १० बिगे जमीन विकून ४२ लाख रुपये पतसंस्थेत जमा केले होते.
मिळकतींचा लिलाव करण्याची धमकी
परतफेडीनंतरही अग्रेसर पतसंस्थेचे चेअरमन पद्माकर अग्रेसर यांनी मिळकतीवरील बोजा कमी केला नव्हता. उर्वरित शेतजमीनदेखील त्यांनी पतसंस्थांच्या नावे करून त्यांचा लिलाव करण्याची धमकी दिली होती. याच जाचास कंटाळून चेतनचा भाऊ सागरने आत्महत्या केली होती. त्यानंतर ६ रोजी चेतनने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पद्माकर अग्रेसर विरुद्ध भादंवि कलम ३०६, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक अरविंद भोळे करीत आहेत.

Web Title: The crime of motivating the leading credit society chairman on suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.