बलात्कार आणि हत्येच्या आरोपातील मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी खेळली अशी चाल, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 09:11 AM2024-11-12T09:11:00+5:302024-11-12T09:12:01+5:30

Crime News: बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी धक्कादायक चाल खेळत पोलिसांसह न्यायालयालाही चकवा दिल्याची बाब समोर आली आहे.

Crime News: A trick played by a father to save his son accused of rape and murder, then…   | बलात्कार आणि हत्येच्या आरोपातील मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी खेळली अशी चाल, त्यानंतर...  

बलात्कार आणि हत्येच्या आरोपातील मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी खेळली अशी चाल, त्यानंतर...  

बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी धक्कादायक चाल खेळत पोलिसांसह न्यायालयालाही चकवा दिल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, त्यांच्या चातुर्याचा भांडाफोड झाल्यानंतर पोलिसही अवाक् झाले. बलात्कार आणि हत्येची ही घटना उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे २०१६ मध्ये घडली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, मोहनलाल नावाच्या एका व्यक्तीला मुलासाठी शाळेचं बनावट ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवल्याच्या आरोपाखाली अटक करण्याता आली आहे. त्याने मुलाच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटच्या तारखांमध्ये खाडाखोड केली होती. २०१६ मध्ये जेव्हा बलात्कार आणि हत्येची घटना घडली, तेव्हा आरोपी असलेला त्याचा मुलगा हा अल्पवयीन होता, असं दाखवण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते. त्यासाठी शाळेचा मुख्याध्यापक असलेल्या नथुराम याने त्याला मदत केली होती. आता नथुराम फरार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहनलाल याच्या मुलग्याला २०१६ मध्ये ग्रेटर नोएडामधील इकोटेक-३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तुरुणीवर कथितपणे बलात्कार करून हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मोहनलाल याने त्याच्या मुलाला या प्रकरणातून वाचवण्यासाठी त्याला अल्पवयीन दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने शाळेतील मुख्याध्यापक नथुराम याच्या मदतीने बनावट ट्रान्सफर सर्टिफिकेट तयार केले. या प्रमाणपत्राच्या आधारावर कोर्टानेही आरोपी मुलाला अल्पवयीन मानून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली.

मात्र पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी या प्रकरणाचा भांडाफोड करताना किशोर न्याय बोर्डासमोर योग्य कागदपत्र सादर केली. त्यानंतर पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरुवात केली. त्यामध्ये मुलाला या खटल्यातून वाचवण्यासाठी त्याचा बाप मोहनलाल याने ट्रान्सफर सर्टिफिकेटमध्ये फेरफार केल्याचे समोर आले. त्यानंतर मोहनलाल याला सोमवारी अटक केली. तसेच फरार नथुराम याचा शोध सुरू आहे.  

Web Title: Crime News: A trick played by a father to save his son accused of rape and murder, then…  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.