Crime News : पाकिस्तानी ध्वज फडकावत नारेबाजी, वाराणसीत युवकावर झाली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 07:21 PM2021-10-30T19:21:41+5:302021-10-30T19:23:23+5:30
राजातालाब पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या भवानीपूर गावातील शेखू यांचा 20 वर्षीय युवक व्यवसायाने ट्रेलर आहे. शुक्रवारी झुम्म्याची नमाज पठण केल्यानंतर स्वत: पाकिस्तानचा झेंडा शिवून घेतला.
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यक्षेत्र असलेल्या वाराणसीमध्ये एका युवकाने पाकिस्ताना झिंदाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी ध्वज फडकवला होता. वाराणसीतील भवानीपूर गावातील आपल्या घरावरील छतावर पाकिस्तानचा झेंडा फडकावणे तरुणाला चांगलंच महागात पडले आहे. राजातालाब पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताज मोहम्मद यास अटक केली आहे. त्यानंतर, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
राजातालाब पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या भवानीपूर गावातील शेखू यांचा 20 वर्षीय युवक व्यवसायाने ट्रेलर आहे. शुक्रवारी झुम्म्याची नमाज पठण केल्यानंतर स्वत: पाकिस्तानचा झेंडा शिवून घेतला. त्यानंतर, घरावरील छतावर जाऊन तो हातानेच फडकवला, तसेच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाही दिल्या. दरम्यान, यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी ताज मोहम्मदला पाहून विरोध केला. लोकांच्या विरोधानंतरही तो झेंडा खाली घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे, स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी शेखू यांच्या घरी जाऊन छतावरील झेंडा खाली उतरवला. दरम्यान, ताजने घरातून पलायन केले होते, त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेऊन ताजला अटक केली.
शेजाऱ्यांनी उकसवल्यामुळेच आपण पाकिस्तानचा झेंडा घराच्या छतावर फडकवल्याचे ताजने पोलिसांच्या तपासात सांगितले. मात्र, शेजाऱ्यांनी नेमकं कोणत्या कारणासाठी उकसवलं होतं, हे त्याने सांगितलंच नाही. देशविरोधी कृत्या केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून आता शेजाऱ्यांची चौकशी सुरू असून ताजला कोणी आणि का उकसवलं होतं, त्याचा तपास स्थानिक पोलिस करत आहेत.