संतापजनक! बुरख्याऐवजी जीन्स घातली म्हणून 'तिला' दुकानाबाहेर काढले; टोमणे मारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 12:46 PM2021-11-02T12:46:43+5:302021-11-02T12:48:56+5:30

Crime News : एका मुलीने बुरखा न घालता जीन्स घातल्यामुळे तिला दुकानातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Crime News assam woman thrown out of shop for wearing jeans not burqa | संतापजनक! बुरख्याऐवजी जीन्स घातली म्हणून 'तिला' दुकानाबाहेर काढले; टोमणे मारले 

संतापजनक! बुरख्याऐवजी जीन्स घातली म्हणून 'तिला' दुकानाबाहेर काढले; टोमणे मारले 

Next

नवी दिल्ली - आसाममध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका मुलीने बुरखा न घालता जीन्स घातल्यामुळे तिला दुकानातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यातील एका दुकान मालकाने मुलीशी गैरवर्तन केलं. दुकानातून बाहेर काढल्याचा आणि वडिलांना मारहाण केल्याचा आरोप मुलीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 230 किमीवर विश्वनाथ चरियाली येथील मोबाईल फोनच्या दुकानात घडली. 

मुलगी या दुकानात इअरफोन खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी दुकानाचा मालक नुरुल अमीन याने तिला इअरफोन देण्यास नकार दिला. तसेच बुरख्याऐवजी जीन्स घातल्याबद्दल मुलीला लज्जास्पद वागणूक दिली, गैरवर्तन केले आणि त्यानंतर त्याने तिला दुकानाबाहेर ढकलले. "जेव्हा मी दुकानात पोहोचले तेव्हा दुकान मालकाने माझ्याशी गैरवर्तन केले आणि मला दुकानात पुन्हा न येण्यास सांगितले. त्याने मला दुकानातून बाहेर ढकलून दिले" असं मुलीने म्हटलं आहे. दुकानदाराच्या या अशा वागण्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. 

जीन्स घातल्याने मुलीसोबत गैरवर्तन

"दुकानदाराने माझी सून बुरखा किंवा हिजाब घालते, त्यामुळे मी जीन्स घालून त्याच्या घरी गेले तर त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होईल" असं मुलीला म्हटलं. एक वृद्ध व्यक्ती हे दुकान चालवत असल्याचं मुलीने सांगितलं. मुलगी घरी परतली आणि तिने संपूर्ण प्रकरण तिच्या पालकांना सांगितला. दुकान मालकाच्या वागणुकीची तक्रार करण्यासाठी तिचे वडील दुकानात गेले.

जाब विचारायला गेलेल्या वडिलांना केली मारहाण

दुकानदार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. "दुकानदाराच्या दोन मुलांनीही माझ्या वडिलांशी गैरवर्तन केले आणि त्यांच्यावर हल्ला केला" असा दावा मुलीने केला आहे. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Read in English

Web Title: Crime News assam woman thrown out of shop for wearing jeans not burqa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.