"माझ्या पतीने मला सेक्स स्लेव बनवलं, तरुणींसोबत..."; भाजपा नेत्याच्या सुनेचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:40 PM2022-02-04T16:40:13+5:302022-02-04T17:06:51+5:30
भाजपा नेत्याच्या सुनेची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशातील एका भाजपा नेत्याच्या (BJP) सुनेने गंभीर आरोप केले आहे. सुनेची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तिने केलेल्या आरोपानुसार, पतीने तिला सेक्स स्लेव बनवून तिचा वापर केला. लग्नानंतर फक्त सहा महिन्यांतच मी जिवंत मृतदेहाप्रमाणे जगत असल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमधून भाजपा आमदार जालम सिंह पटेल यांच्या मुलाची पत्नी नीतू सिंह हिने हे धक्कादायक आरोप केले आहेत. आता मी दिल्लीत राहून नोकरी करते आणि न्यायालयात घटस्फोटासाठी लढत असल्याचं तिने सांगितलं. 2016 मध्ये तिला भाजपा आमदार जालम सिंह पटेल यांच्या मुलासाठी विचारणा झाली होती. तेव्हा नीतूचं 26 वर्षे होतं. त्यावेळी तिने लग्नाला नकार दिला. पण राजकारणात हे करावं लागतं असंच तिला वारंवार सांगितलं जात होतं. सुरुवातीला मुलावर कोणतेच कायदेशीर गुन्हे दाखल नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र लग्नानंतर कळालं की, हत्या, हत्येचा प्रयत्न याअंतर्गत त्याच्यावर 45 गुन्हे दाखल आहेत असं म्हटलं आहे.
"शिक्षणाबद्दलही त्यांनी खोटचं सांगितलं. सामाजिक कार्यात असल्याचं सांगितलं होतं, मात्र लग्नानंतर कळालं की, हे सर्व खोटं आहे. लग्नाच्या आधी त्यांनी शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली होती. नकार दिल्यामुळे तो राग कायम त्यांच्या मनात होता. लग्नानंतर माझा मोबाईल नंबर बदलला. माझं घरातून बाहेर जाणं बंद केलं. याशिवाय मी फोनवर कोणाशी बोलते हे देखील तपासलं जात होतं. आणि मला अनेक प्रश्न विचारले जात होते. याशिवाय आमदाराच्या मुलाचे बाहेर अनैतिक संबंध होते. मुलगा दररोज बाहेर गर्लफ्रेंडसोबत फिरत असे आणि घरी येऊन माझ्यावर जबरदस्ती करीत होता" असं सुनेने म्हटलं आहे.
धक्कादायक म्हणजे त्यांचं सरकारी निवासस्थान हे ड्रग्स आणि दारूचा अड्डा असल्याचाही आरोप नीतूने केला आहे. यासंदर्भात तिच्याकडे पुरावे असल्याचं तिचं म्हणणं आहे. पत्नीला मारहाण करणे, तिला स्वातंत्र्य न देणं, तिच्याकडे सतत लक्ष ठेवणे, तिला नीट झोपू दिलं जात नव्हतं. त्यामुळेच प्रकृती ढासळ्याचं सुनेनं म्हटलं आहे. सासूला तसेच माहेरच्या मंडळींना अनेकदा सांगितलं. मात्र त्यांनीही काही दिवसात हे सर्व ठीक होईल असंच म्हटलं. थोडं समजून घेण्याचा सल्ला दिला. याबाबत तिने आमदार सासऱ्यालाही अनेकदा सांगितलं. मात्र ते या प्रकरणात सर्व ठीक होईल, इतकच सांगत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.