अरे देवा! पहिल्या पत्नीने धोका दिला म्हणून 90 दिवसांत केली 3 लग्न; दोघी गेल्या सोडून अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:25 PM2022-07-19T13:25:09+5:302022-07-19T13:27:46+5:30

Crime News : एका व्यक्तीने 90 दिवसांत तीन लग्न केली. धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्नी त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्या.

Crime News man commits suicide after two wives absconding in udaipur rajasthan | अरे देवा! पहिल्या पत्नीने धोका दिला म्हणून 90 दिवसांत केली 3 लग्न; दोघी गेल्या सोडून अन्...

अरे देवा! पहिल्या पत्नीने धोका दिला म्हणून 90 दिवसांत केली 3 लग्न; दोघी गेल्या सोडून अन्...

googlenewsNext

नवी दिल्ली - राजस्थानच्या उदयपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने 90 दिवसांत तीन लग्न केली. धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्नी त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्या. तर एकीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे दुखावलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे तो दु:खी असल्याचं म्हटलं जात असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो तणावात होता. स्थानिकांनी तरुणाला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती खुर्द येथील निवासी असून त्याचं नाव खेमराज (42) असं आहे. मृत व्यक्ती रिक्षा चालवून कुटुंबाचं पालनपोषण करीत होता. या घटनेनंतर लोकांनी मोठी गर्दी केली होती. 

खेमराजच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेली होती. ज्यानंतर काही दिवस खेमराजने लग्न केलं नाही. यानंतर तीन महिन्यात एक-एक करीत तीन लग्न केलं. ज्यापैकी एका पत्नीचा मृत्यू झाला.

दोघीजणी दुसऱ्या पुरुषांसोबत फरार झाल्या. जेव्हापासून दोघी घरातून गेल्या तेव्हापासून खेमराज तणावात होते. कोणाशीही फार बोलत नव्हते. याच तणावातून त्यांनी जीव दिल्याचं खेमराजच्या मुलाने सांगितलं. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून तपासाअंती नेमकं कारण समोर येईल, असं सांगितलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News man commits suicide after two wives absconding in udaipur rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.