Crime : गुन्हा घडण्याआधीच घटनास्थळावर पोहोचले पोलीस, तीन मोठे गुन्हे रोखले, तीन आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:12 PM2023-03-09T17:12:08+5:302023-03-09T17:12:42+5:30
Crime News: एखादा गुन्हा घडल्यानंतर तिथे पोलिसांची एंट्री होतो हे तुम्ही सिनेमात पाहिलं असेलच. पोलिसांनी तत्परता आणि कर्तव्य दक्षता दाखवत होणारे तीन मोठे गुन्हे रोखून आरोपींना बेड्या ठोकल्याची घटना समोर आली आहे.
एखादा गुन्हा घडल्यानंतर तिथे पोलिसांची एंट्री होतो हे तुम्ही सिनेमात पाहिलं असेलच. पोलिसांनी तत्परता आणि कर्तव्य दक्षता दाखवत होणारे तीन मोठे गुन्हे रोखून आरोपींना बेड्या ठोकल्याची घटना समोर आली आहे. पाटणा पोलिसांनी होळीदिवशी घडणाऱ्या तीन संभाव्य गुन्ह्यांना रोखत त्वरित कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून तीन पिस्तूल, एक अवैध रायफल, एक एअर गन, तीन जिवंत काडतूस एक मॅगझिन त्याबरोबरच एक पिस्तुलासारखं दिसणारं अन्य हत्यारही पोलिसांनी जप्त केलं.
पहिली घटना बायपास ठाणे क्षेत्रातील गुरु गोविंद सिंह लिंक रोडवर घडली. तिथे रस्त्याच्या वादावरून पाटणा सिटी सेंट्रल स्कूल दर्शन विहारचे डायरेक्टर डॉ. पवन कुमार दर्शन यांच्याकडून स्थानिकांना हत्याराचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी आणि गोळीबार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
दुसरी घटना आलमगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील बडी पटन देवी कॉलनीमध्ये घडली, येथे मद्याच्या नशेत अंधाधुंद गोळीबार करणारा प्रॉपर्टी डिलर अरुण कुमार चंद्रवंशी याला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे.
तर तिसऱ्या घटनेमध्ये आलमगंज पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणे क्षेत्रातील दुर्गाचरण लेनमध्ये छापेमारी करून गुन्हेगारी कट पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने पिरत असलेल्या राजेश चौधरी नावाच्या गुन्हेगाराला अटक केली. पोलिसांनी अटक आरोपीकडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतूस आणि एक मॅगझिन जप्त केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांच्या सक्रियतेमुळे तीन मोठे गुन्हे टळले. अटक करण्यात आलेला आरोपी राजेश चौधरी हा याआधी हत्या आणि आर्म्स अॅक्ट प्रकरणात तुरुंगात गेलेला आहे. पोलीस सध्या अकट आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड शोधून काढत आहेत.