माजी मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्यासाठी चाकू घेऊन स्टेजवर आला तरुण; दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 10:32 AM2022-01-07T10:32:53+5:302022-01-07T10:34:27+5:30

Harish Rawat : रावत काशीपूर येथील एका सभेत असताना एक व्यक्ती चाकू घेऊन थेट स्टेजवर पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News security breach of former cm Harish Rawat in uttarakhand person reached stage with knife | माजी मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्यासाठी चाकू घेऊन स्टेजवर आला तरुण; दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा

माजी मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्यासाठी चाकू घेऊन स्टेजवर आला तरुण; दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा

Next

नवी दिल्ली - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Former CM Harish Rawat) यांच्या सुरक्षिततेत मोठी चूक झाली आहे. रावत काशीपूर येथील एका सभेत असताना एक व्यक्ती चाकू घेऊन थेट स्टेजवर पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. पण यावेळी स्टेजवर आणि आसपास उपस्थित असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. तसेस हल्ला करणाऱ्या व्यक्तीने 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

माजी मुख्यमंत्री हरीश रावत एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. याठिकाणी जाहीर सभा संपल्यानंतर अचानक एक व्यक्ती चाकू घेऊन स्टेजवर चढला आणि एकच गोंधळ उडाला. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी संबंधित व्यक्तीला स्टेजवरून खाली उतरवून त्याच्याकडील चाकू आपल्या ताब्यात घेतला आहे. तसेच आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री हरीश रावत प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेत सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी भाषण संपल्यानंतर रावत स्टेजवरील आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. 

जय श्री राम न बोलल्यास जीवे मारण्याची धमकी

अचानक एक व्यक्ती स्टेजवर पोहोचला. स्टेजवर आल्यानंतर त्याने माईकवरून जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याची अडवणूक करत माईक बंद केला. संतापलेल्या आरोपीने अचानक आपल्या जवळील चाकू काढला. तसेच जय श्री राम न बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. दरम्यान काँग्रेस नेते प्रभात साहनी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पकडून त्याच्याकडील चाकू ताब्यात घेतला. ही प्रशासनाची मोठी चूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत बुधवारी एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाने मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. एका उड्डाणपुलावर जवळपास 15 ते 20 मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे. 
 

Web Title: Crime News security breach of former cm Harish Rawat in uttarakhand person reached stage with knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.