Crime News : 'आई' असं करू शकते?; सतत आजारी असलेल्या पोटच्या मुलीला महिलेनं तिसऱ्या मजल्यावरून फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:18 PM2023-01-02T13:18:00+5:302023-01-02T13:18:50+5:30

३० वर्षीय महिलेने आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला सिव्हिल हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना घडली.

Crime News The woman threw the girl who was constantly sick from the third floor gujarat | Crime News : 'आई' असं करू शकते?; सतत आजारी असलेल्या पोटच्या मुलीला महिलेनं तिसऱ्या मजल्यावरून फेकलं

Crime News : 'आई' असं करू शकते?; सतत आजारी असलेल्या पोटच्या मुलीला महिलेनं तिसऱ्या मजल्यावरून फेकलं

googlenewsNext

आणंदच्या पेटलाड येथील एका ३० वर्षीय महिलेने आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला सिव्हिल हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना घडली. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुरुवातीला मुलगी बेपत्ता झाल्याचे सांगून या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

फरझाना हिने दोन महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगी जन्मानंतर सतत आजारी राहत होती. तिच्यावर च्यावर नडियाद आणि बडोदा येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर मुलीला अहमदाबादमधील १२०० खाटांच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु मुलीच्या आजाराला कंटाळून तिच्या  आईने सोमवारी पहाटे तिला तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिलं. यात त्या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेच्या पतीने पत्नीविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच फरझाना या महिलेनं मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर लगेचच तिला २४ दिवस बडोद्यातील एसएसजी रुग्णालयात दाखल करम्यात आले. त्यावेळी तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मुलीनं खराब पाणी प्यायल्यामुळे तिला त्रास होत असल्याचं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा एकदा तिला आतड्याचा त्रास झाला. तेव्हा तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सोमवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फरझाना रडत आपल्या पतीकडे आली. तसंच आपली मुलगी आसपास दिसत नसल्याचं सांगितलं. आसिफनंही शोधाशोध केली. परंतु ती सापडली नाही. यानंतर त्यानं कंट्रोल रुमला फोन केला. शाहीबाग पोलिसांची एक टीम यानंतर रुग्णालयात पोहोचली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा फरझाना लहान मुलीसोबत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीजवळ जाताना दिसली. जेव्हा ती पुन्हा वॉर्डमध्ये आली तेव्हा मुलगी तिच्यासोबत नव्हती. यावर आसिफिनं फरझानाला विचारणा केली. तेव्हा तिनं आपण तिला तिसऱ्या मजल्यावरून फेकल्याचं कबुल केलं. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली तिला अटक केली.

Web Title: Crime News The woman threw the girl who was constantly sick from the third floor gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.