बिहारमधील पाच अल्पवयीन मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:17 AM2018-06-22T04:17:49+5:302018-06-22T04:17:49+5:30
रोहतास जिल्ह्यातील नसरीगंज गावात रमझान ईदच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘जिहाद’चे समर्थन करणारे गाणे लावून त्यावर नाच केल्याबद्दल पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह एकूण आठ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे.
पाटणा : रोहतास जिल्ह्यातील नसरीगंज गावात रमझान ईदच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘जिहाद’चे समर्थन करणारे गाणे लावून त्यावर नाच केल्याबद्दल पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह एकूण आठ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यवीर सिंग यांनी सांगितले की, चंदन थातेरा नावाच्या इसमाने या नाचगाण्याचा व्हिडीओ काढला आणि तो मनोज बजरंगी या स्थानिक नेत्यास दिला. त्यांनी त्याची व्हिडीओ क्लिप दिल्यानंतर गुन्हा नोंदविला. व्हिडीओत ज्या आठ जणांची
ओळख पटली, त्यांच्यावर देशद्रोहासह अन्य गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली गेली. अटक केलेली पाच मुले १४ ते १७ वयोगटातील असून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. पोलिसांनी या घटनेबद्दल जरूर खंबीर पावले उचलावीत; पण जिहादी गाण्यावर अजाणतेपणी नाचलेल्या मुलांना सोडून द्यावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.