महिलांविरुद्धचे गुन्हे; कठोर शिक्षा हवी
By Admin | Published: May 10, 2015 11:48 PM2015-05-10T23:48:18+5:302015-05-10T23:48:18+5:30
महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी शिक्षा ठोठावताना न्यायालयांनी कठोर धोरण अवलंबण्याची गरज आहे. जेणेकरून ही शिक्षा ‘प्रतिबंधक’ म्हणून काम करेल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने रविवारी व्यक्त केले.
नवी दिल्ली : महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी शिक्षा ठोठावताना न्यायालयांनी कठोर धोरण अवलंबण्याची गरज आहे. जेणेकरून ही शिक्षा ‘प्रतिबंधक’ म्हणून काम करेल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने रविवारी व्यक्त केले. महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांच्या तुलनेत आरोपींना दिली जाणारी शिक्षा कठोर नसल्याचे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नोंदवले.
अशा खटल्यांमध्ये शिक्षा सुनावताना कठोर धोरण अवलंबण्याची गरज ही शिक्षा ठोठावताना खंडपीठाने व्यक्त केली. अनेक गंभीर प्रकरणात, आरोपींना ठोठावली जाणारी शिक्षा त्यांच्या गुन्ह्यांच्या गंभीरतेप्रमाणे नसते.
यामुळे आरोपी शिरजोर होताना दिसतात. याचा परिणाम म्हणजे, व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास यामुळे डळमळू लागतो. म्हणूनच महिलांविरुद्धच्या गंभीर प्रकरणात गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा देण्याचे धोरण अंगीकारून पीडित आणि समाजाला न्याय मिळाल्याचे समाधान देणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने यावेळी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)