बोटांच्या ठशांवरून ४८ तासांत महाराष्ट्रात होतेय गुन्ह्यांची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:34 AM2020-09-11T00:34:59+5:302020-09-11T00:39:56+5:30
देशात सर्वाधिक १.६५ लाख बोटांचे ठसे राज्याने केले गोळा
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : महाराष्ट्रपोलिसांचे हात प्रत्येक ४८ तासांत एका गुन्ह्यातील गुन्हेगारांपर्यंत त्यांनीच मागे सोडलेल्या बोटांच्या ठशांवरून पोहोचत आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडील ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०१९ मध्ये सगळ्यात जास्त १८२ गुन्ह्यांच्या ठिकाणी गुन्हेगारांच्या मिळालेल्या बोटांच्या ठशांवरून त्यांना ओळखता आले. देशात ६२६ गुन्ह्यांत हे शक्य झाले.
महाराष्ट्रात ३० जानेवारी, २०१९ रोजी चार वर्षांची मुलगी व तिची आई यांची गळा चिरून हत्या झाली होती. बोटांच्या ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी रक्तात माखलेल्या बुटाचे ठसे मिळवले. त्यातून हे दोन खून मुलीच्या वडिलांनी स्वत:च्या मैत्रिणीच्या मदतीने केले, हे स्पष्ट झाले. हत्यांनंतर त्यांचे मृतदेह त्यांनी जाळून टाकले होते. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांमुळे पोलीस खुन्यांपर्यंत पोहोचले.
जून २०१९ मध्ये मुंबईत ज्वेलरी शोरूमचे शटर कापून लूट झाली होती. तेथे मिळालेल्या बोटांच्या ठशांवरून पोलीस गुन्हेगार मोहम्मद
जफर कलीम शेख याच्यापर्यंत पोहोचू शकले. या घटनेसोबत पोलिसांनी चुहा माना नावाच्या कुख्यात गुन्हेगाराला पकडून लुटीच्या ३४ गुन्ह्यांना एका फटक्यात सोडवले आणि लूटही जप्त केली.नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक ज्वेलरी शोरूममध्ये लूट झाली होती. तेथे तीन-चार बोटांचे ठसे हाती लागले. त्यामुळे लॉकर तोडून सोने आणि रोख लुटणारा संतोष तिजवीजला पकडता आले.
महिलांबाबतच्या गुन्ह्यांतही सर्वाधिक २८६ बोटांचे ठसे
च्महिलांबाबतच्या गुन्ह्यांतही महाराष्ट्रात सर्वाधिक २८६ बोटांचे ठसे आणि ४,८८० चान्स प्रिंट गोळा केले. च्राज्यात एका वर्षात चोरीच्या घटनांत १३,७३०, घरफोडीत ७,६४०, लुटीत ४,९१०, दरोड्यात १० डिजिटची सगळ्यात जास्त १,५३२ सर्च स्लिप बनवली गेली. च्याशिवाय फसवणुकीच्या ४,३६१, विश्वासघात २,७५४ आणि भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्ह्यांत ६९,५८६ सर्च स्लिप बनवल्या गेल्या.
1898 महाराष्ट्रात फिंगर प्रिंट ब्युरोची सुरुवात मुंबईत मध्ये झाली. 1905 मध्ये त्याचे मुख्यालय पुण्यात बनवले गेले. सीआयडीच्या (पुणे) एडीजी रँकच्या अधिकाºयाच्या मार्गदर्शनात काम करणाºया या विभागात चार शाखा असून, त्या पुणे आणि मुंबईशिवाय नागपूर आणि औरंगाबादेत कार्यरत आहेत.