दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - धनजंय मुंडे इमारत दुरुस्ती मंडळ स्थापन करण्यास चालढकल का?

By admin | Published: August 5, 2015 10:19 PM2015-08-05T22:19:15+5:302015-08-05T22:19:15+5:30

ठाणे : ठाणे आणि परिसरात इमारती कोसळून वर्षभरात जवळपास दीडशेहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यातील अनेक इमारती या धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या आहेत. इमारती धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रि येत भ्रष्टाचार असून यात लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक व पालिका प्रशासन यांची अभद्र युती असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच इमारत दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Criminal cases should be registered against those responsible for the accident - can it be set up to establish Dhananjay Munde Building Amendment Board? | दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - धनजंय मुंडे इमारत दुरुस्ती मंडळ स्थापन करण्यास चालढकल का?

दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - धनजंय मुंडे इमारत दुरुस्ती मंडळ स्थापन करण्यास चालढकल का?

Next
णे : ठाणे आणि परिसरात इमारती कोसळून वर्षभरात जवळपास दीडशेहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यातील अनेक इमारती या धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या आहेत. इमारती धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रि येत भ्रष्टाचार असून यात लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक व पालिका प्रशासन यांची अभद्र युती असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच इमारत दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नौपाडा येथे मंगळवारी झालेल्या इमारत दुर्घटनेच्या ठिकाणाला त्यांनी बुधवारी भेट दिली तसेच जखमींचीही विचारपूस केली. कृष्ण निवास ही इमारत धोकादायक नसताना कशी पडली, ठाण्यातील धोकादायक असलेल्या अनेक इमारतींच्या रहिवाशांनी इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यासाठी मागणी केली असताना त्या इमारती धोकादायक म्हणून जाहीर न करता ज्या धोकादायक नाहीत, अशा इमारतींना धोकादायक घोषित करून त्या पाडण्याचा प्रकार ठाण्यात घडत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली अनेक धोकादायक नसलेल्या इमारती धोकादायक म्हणून ठरविल्या जात आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या काम करणार्‍यांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला हवे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनीदेखील या इमारत दुर्घटना प्रकारास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप या वेळी केला.
पालिका प्रशासन, शिवसेना आणि राज्यातील भाजपा सरकार एका दिवसात देवा कॉर्पोराचे अनधिकृत मजले अधिकृत करण्यासाठी जो नियम लावला, तोच नियम ठाणेकरांसाठी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
.................................................................................................................
मुंबई, नवी मुंबई या शहरांतील नादुरुस्त इमारतींसाठी दुरुस्ती महामंडळ स्थापन करण्याची परवानगी दिलेली असताना अशी परवानगी ठाण्याला का मिळत नाही, असा प्रश्नदेखील मुंडे यांनी उपस्थित केला. इमारती दुरुस्त झाल्या तर बांधकाम व्यावसायिकांना धंदा मिळणार नाही, म्हणून अशा महामंडळाला परवानगी दिली जात नाही की काय, असा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचे महामंडळ होण्यासाठी व धोकादायक इमारती ठरविण्याच्या निकषांबाबत नागरिकांच्या भावना तीव्र असून त्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारादेखील मुंडे यांनी या वेळी दिला.

Web Title: Criminal cases should be registered against those responsible for the accident - can it be set up to establish Dhananjay Munde Building Amendment Board?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.