वीणू पालिवालचा अपघाती मृत्यू

By admin | Published: April 13, 2016 02:39 AM2016-04-13T02:39:54+5:302016-04-13T02:39:54+5:30

‘लेडी आॅफ द हर्ले’ या किताबाने पुरस्कृत प्रसिद्ध महिला बायकर वीणू पालिवाल हिचे सोमवारी सायंकाळी विदिशा जिल्ह्याच्या ग्यारसपूर गावाजवळ मोटारसायकल घसरून

Criminal Death of Venus Palival | वीणू पालिवालचा अपघाती मृत्यू

वीणू पालिवालचा अपघाती मृत्यू

Next

विदिशा (मध्यप्रदेश) : ‘लेडी आॅफ द हर्ले’ या किताबाने पुरस्कृत प्रसिद्ध महिला बायकर वीणू पालिवाल हिचे सोमवारी सायंकाळी विदिशा जिल्ह्याच्या ग्यारसपूर गावाजवळ मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
३० वर्षीय वीणू ‘हर्ले डेव्हिडसन’ या तिच्या आवडत्या मोटारसायकलवर आपला सहकारी दीपेश तंवर याच्यासह काश्मीर ते कन्याकुमारी दौऱ्यावर निघाली होती. सोमवारी सकाळी ती लखनौ येथून भोपाळला रवाना झाली होती. ग्यासरपूरजवळ तिची बाईक रस्त्यावर घसरली. गंभीर जखमी वीणूला प्रथमोपचारानंतर विदिशाला नेत असताना मार्गातच तिचा मृत्यू झाला.
पोलीस या प्रकरणाची सविस्तर चौकशी करीत असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश तिवारी यांनी दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Criminal Death of Venus Palival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.