निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? न्यायाधीशांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2016 07:58 AM2016-04-18T07:58:33+5:302016-04-18T07:58:33+5:30
निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १८ - निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारला आहे. कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले असतानादेखील ही परिस्थिती का ? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला आहे. देशातील विविध क्षेत्रांतील प्रगती या विषयावर भोपाल न्यायालयीन अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना हा प्रश्न विचारण्यात आला आहे.
न्यायाधीस एस वाय कुरेशी यांनी निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस ठाकूर यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मतदान रिंगणात गुन्हेगारी घटकांना येण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काय पाऊल उचलली ? याची माहिती कुरेशी यांनी ठाकूर यांच्याकडे मागितली. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये तसंच सत्तेत असणा-या पक्षाला कोणताही चुकीचा फायदा मिळू नये यासाठी निवडणूक आयोगाने पुर्ण प्रयत्न केले आहेत अशी माहिती माजी अध्यक्ष टी एस ठाकूर यांनी दिली आहे.
निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देणा-या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी पाऊल का उचलली गेली नाहीत ?
याबाबतही न्यायाधीशांनी विचारणा केली. प्रत्येक उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहण्याइतकं मनुष्यबळ निवडणूक आयोगाकडे नाही आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे असणारे उमेदवार जेव्हा अशी काही माहिती देतात तेव्हा कारवाई करण्यात येते असं ठाकूर यांनी सांगितलं आहे.
कायद्याची बंधन असतानाही निवडणुकांमध्ये वापरण्यात येणा-या पैशांवरुनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करण्यात येत असण्यावरुन काळजी व्यक्त केली आहे. लोकशाहीसाठी हा धोका असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.