गुन्हे वार्ता - जोड
By admin | Published: February 21, 2015 12:49 AM2015-02-21T00:49:35+5:302015-02-21T00:49:35+5:30
मेडिकलमधून महिला डॉक्टरची बॅग लंपास
Next
म डिकलमधून महिला डॉक्टरची बॅग लंपासनागपूर : शंकरनगरातील डॉ. अर्चना हेमंत देशपांडे (५४) व त्यांच्या सहयोगी प्राध्यापिका धरित्री मुकुंद भट (४९) रा. मेडिकल कॉलनी, भगवाननगर या दोघीही एका सेमिनारसाठी मेडिकल कॉलेजमध्ये आल्या होत्या. सेमिनारमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या बॅग ज्यात दोन लॅपटॉप, एक कॅमेरा, मोबाईल, लेटर बॅड, २०० रुपये रोख व इतर कागदपत्र असा १,०५,२०० रुपयांचा मुद्देमाल मेडिकलच्या विकृतीशास्त्र विभागातील लेडीज कॉमन रुममध्ये ठेवून सेमिनारमध्ये सहभागी झाल्या. अज्ञात चोरट्याने रुमचा दरवाजा उघडून दोन्ही बॅग लंपास केल्या. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ०-०-०-०-०-०-००नवजात अर्भक नालीत आढळलेनागपूर : वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील रमाबाई चौक, आंबेडकरनगर येथील मोरेश्वर पाटील यांच्या घरासमोर नालीत एक नवजात अर्भक आढळले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडील पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ०-०-०-०-०-०-०गाडीच्या डिक्कीतून २० हजार पळविलेनागपूर : मेडिकल क्वॉर्टर, जाटतरोडी, टीबी वार्ड येथील रहिवासी निधी सुरेंद्र यादव (२२) या युवतीने आपल्या घरासमोर दुचाकी गाडी उभी केली होती. गाडीच्या डिक्कीत त्यांनी ठेवलेल्या पर्समध्ये २० हजार रुपये रोख व इतर कागदपत्रे होती. दुपारी १२ च्या सुमारास अज्ञात चोरट्याने बाहेर कुणीही नसल्याचे बघून डिक्की उघडून गाडीतील पर्स पळविली. इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ०-०-०-०-०-०-०-०-गिट्टीखदान परिसरात महिलेचा विनयभंगनागपूर : गिट्टीखदान परिसरात राहणारी एक ३५ वर्षीय महिला आपल्या घरापुढे उभी असताना, इंद्रप्रताप सिंग (१९) रा. गिट्टीखदान हा आपल्या मित्रासोबत मोठ्याने बोलत असल्यामुळे महिलेने त्याला हटकले. त्यामुळे इंद्रप्रताप याने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. त्याचबरोबर भानुप्रताप सिंग सुरेंद्रप्रताप सिंग (४५) रा. गिट्टीखदान यानेही महिलेला शिवीगाळ करून, महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून, आरोपींना अटक केली आहे. ०-०-०--०-०-००-०---