जलिकट्टू आंदोलनात समाजकंटकही
By admin | Published: January 28, 2017 12:57 AM2017-01-28T00:57:35+5:302017-01-28T00:57:35+5:30
जलिकट्टूच्या समर्थनासाठी मरिना समुद्र किनाऱ्यावर चाललेल्या आंदोलनात समाजकंटक आणि संघटनांनी शिरकाव केला होता,
चेन्नई : जलिकट्टूच्या समर्थनासाठी मरिना समुद्र किनाऱ्यावर चाललेल्या आंदोलनात समाजकंटक आणि संघटनांनी शिरकाव केला होता, असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेलवम यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. सोमवारी झालेल्या हिंसाचारामागे ज्या वाईट शक्ती आहेत त्यांना हुडकून शिक्षा केली जाईल, असेही ते म्हणाले.
जमावाला २३ जानेवारी रोजी पोलिसांनी निघून जाण्यास सांगितले होते. सुमारे दहा हजार लोक निघून गेले, परंतु दोन हजार मागेच राहिले. त्या जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. त्याबद्दल विरोधी पक्ष नेते एम. के. स्टालीन यांनी मुख्यमंत्र्यांकडे खुलासा मागितला होता. त्यावर त्यांनी वरीलप्रमाणे सविस्तर निवेदन केले. पन्नीरसेलवम म्हणाले की, आंदोलन करणाऱ्यांतील काही जणांना हे आंदोलन प्रजासत्ताक दिनापर्यंत चालावे, असे वाटत होते. (वृत्तसंस्था)