पेन्शन योजनेचे सूत्र बदलल्याने टीका
By Admin | Published: August 29, 2016 02:29 AM2016-08-29T02:29:41+5:302016-08-29T02:29:41+5:30
पेन्शन योजनेचे सूत्र अचानक बदलल्यावरून संसदीय समितीने सरकारवर टीका केली आहे. हा तर करारभंग असल्याचे या समितीने म्हटले आहे.
नवी दिल्ली : पेन्शन योजनेचे सूत्र अचानक बदलल्यावरून संसदीय समितीने सरकारवर टीका केली आहे. हा तर करारभंग असल्याचे या समितीने म्हटले आहे. नव्या बदलानुसार १ सप्टेंबर २०१४नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी लाभ मिळत आहेत.
१ सप्टेंबर २०१४पूर्वी १२ महिन्यांच्या सरासरी पगारावर पेन्शनचा हिशेब केला जात होता. तो आता ६० महिन्यांच्या सरासरी पगारावर केला जाणार आहे. म्हणजेच १ सप्टेंबर २०१४च्या एक दिवस अगोदर निवृत्त होणाऱ्या व्यक्तीला १२ महिन्यांच्या सरासरीवर अधिक पेन्शन मिळणार, तर त्यानंतर एक दिवसाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला ६० महिन्यांच्या सरासरीवर कमी पेन्शन मिळणार
आहे.
पावसाळी अधिवेशनात मांडल्या गेलेल्या एका अहवालानुसार, पेन्शन योजनेशी संबंधित कर्मचाऱ्यांना समान सूत्रावर आधारित पेन्शन मिळायला हवी.