सरकारवर टीका करा, पण मातृभूमीचा अवमान नको - रिजिजू

By admin | Published: February 27, 2017 07:37 PM2017-02-27T19:37:27+5:302017-02-27T19:37:27+5:30

राजमस महाविद्यालयात झालेला गोंधळ आणि गुरमेहर कौर विवादावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षामध्ये विवाद वाढत चालला आहे

Criticize the government, but do not insult the motherland - Rijiju | सरकारवर टीका करा, पण मातृभूमीचा अवमान नको - रिजिजू

सरकारवर टीका करा, पण मातृभूमीचा अवमान नको - रिजिजू

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 27 - राजमस महाविद्यालयात झालेला गोंधळ  आणि गुरमेहर कौर विवादावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षामध्ये विवाद वाढत चालला आहे. एकीकडे काँग्रेसने या घटनेसाठी संघ आणि मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. तर  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर देशविरोधी घोषणाबाजी करणे अयोग्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.  
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विद्यापीठांच्या आवारात देशविरोधी घोषणाबाजी करण्याचा परवाना नव्हे. विरोधकांनी सरकारवर टीका करावी, पण मातृभूमीला शिविगाळ करू नये, असे ट्विट केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे. तर भय आणि अत्याचाराविरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता आणि अन्यायाविरोधात उठलेल्या प्रत्येक आवाजात गुरमोहर कौर असेल, असे ट्विट करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. 
दरम्यान, "केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही या विवादावरून विरोधकांना टोला लगावला आहे. "काही व्यक्ती विद्यापीठांना फुटिरतावादाच्या प्रयोगशाळा बनवू इच्छित आहेत. येथे विरोधाचे स्वागत आहे, पण फुटिरतावाद खपवून घेतला जाणार नाही," असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेस आणि आपने गुरमोहर कौरला मिळालेल्या धमक्यांवरून भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. या विवादात उडी घेताना वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानची बाजू घेणाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. 
 

Web Title: Criticize the government, but do not insult the motherland - Rijiju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.