घरासमोरील गार्डनमध्ये आढळली मगर, कुटुंबीयांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:16 AM2020-08-24T10:16:38+5:302020-08-24T10:17:49+5:30

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील ही घटना आहे. येथील विकास कॉलनीच्या बगीचा परिसरात 5 फूट लांबीची मगर आढळून आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

The crocodile was found in the garden area of the house, causing panic among the family in uttar pradesh | घरासमोरील गार्डनमध्ये आढळली मगर, कुटुंबीयांमध्ये घबराट

घरासमोरील गार्डनमध्ये आढळली मगर, कुटुंबीयांमध्ये घबराट

Next
ठळक मुद्देवनविभागाने माहिती मिळताच, तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री 12 वाजता वन खात्यातील कर्मचारी कॉलनीत आले. त्यानंतर, मगरीच्या पिल्लाला पकडण्यात आले.

लखनौ - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही कामाशिवाय घराबाहेर, गावाबाहेर न पडण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, देशातील बहुतांश जनता आजही घरातच असल्याचे दिसून येते. सण-उत्सावाचा काळही यंदा घरातच व्यतीत होत आहे. मात्र, जंगली जनावरं रस्त्यावर उतरत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका नागरिकाच्या घरातील गार्डमध्ये चक्क मगर आढळून आली.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील ही घटना आहे. येथील विकास कॉलनीच्या बगीचा परिसरात 5 फूट लांबीची मगर आढळून आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. कॉलनीतील दशरथ सिंह हे रात्री 10 वाजता आपल्या कुटुंबीयांसमवेत घरासमोरील बगीचा परिसरात फिरत होते. त्यावेळी, गार्डनमध्ये त्यांना काही आवाज आला. त्यामुळे, त्यांनी आवाजाच्या दिशेने जवळ जाऊन निरखून पाहिले असता मगरीचे पिल्लू आढळून आले. मगरीचे हे पिल्लू पाहिल्यानंतर दशरथसिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना घामच फुटला. त्यामुळे, सोसायटीमधील प्रमुखांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर, वन विभागातील अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले. 

वनविभागाने माहिती मिळताच, तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री 12 वाजता वन खात्यातील कर्मचारी कॉलनीत आले. त्यानंतर, मगरीच्या पिल्लाला पकडण्यात आले. मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून हे मगरीचे पिल्लू परिसरात आले. तेथूनच, कॉलनीत शिरल्याचा अंदाज या कर्मचाऱ्यांनी वर्तवला. तसेच, नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन करत, मगरीच्या पिल्लाला घेऊन ते तिथून निघून गेले. 

Web Title: The crocodile was found in the garden area of the house, causing panic among the family in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.