क्रोमा कंपनीचा कंटेनर लुटणारे गजाआड
By admin | Published: September 4, 2015 10:46 PM2015-09-04T22:46:07+5:302015-09-04T22:46:07+5:30
क्रोमा कंपनीचा कंटेनर लुटणारे गजाआड
Next
क रोमा कंपनीचा कंटेनर लुटणारे गजाआडचालकाचा शोध सुरु मुंबई: क्रोमा कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक मालाच्या कंटेनरसह पसार झालेल्या त्रिकुटाच्या दरोडा विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. तर यातील चालकाचा शोध सुरु आहे. माझ हबीबुल्लाह बगा (४५), युसूफ समशेर खान (५२) आणि अदम अब्बास पटेल (२५) अशी अटक केलेल्या त्रिकुटाचे नावे असून त्यांच्याकडून २४ लाख किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.भिवंडी येथील गोडाऊनमधून क्रोमा कंपनीचे इलेक्ट्रीक सामान मुंबईत आणण्याचे काम तक्रारदार दिलीप कदम करतात. २६ ऑगस्ट रोजी अंधेरी येथील क्रोमा शोरुममध्ये इलेक्ट्रॉनिक सामान पोहचविण्यासाठी आरोपी चालकाला पाठविण्यात आले होते. मात्र चालकाने खान आणि अब्बासच्या मदतीने कंटेनरमधील सामान घेऊन पळ काढला होता. मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी जबरी चोरी दरोडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांचे तपास पथक समांतर तपास करत होते. बुधवारी खान आणि अब्बास चोरीचे इलेक्ट्रीक सामान विकण्यासाठी मालाड मालवणी येथील बगाकडे येणार असल्याची माहिती खोत यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून बगासह खान आणि अब्बासला पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या त्रिकुटाकडून २४ लाख ३९ हजार ९२३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पसार चालकाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बगा हा गोरेगाव येथे राहण्यास असून चोरीचे सामान खरेदी करण्याचे काम करतो. तर खान मालाड तर पटेल भिवंडी येथील रहिवाशी आहे. अटक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असून यातील पसार आरोपी चालकाचाही शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)