काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती बिकट सखल भागात नुकसान : भिज पावसाने ओलावा एक मीटरपर्यंत
By admin | Published: July 12, 2016 12:10 AM2016-07-12T00:10:08+5:302016-07-12T00:10:08+5:30
जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल.
Next
ज गाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल. ३ जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. जवळपास सहा दिवस पिकांची मशागत करण्यासह खते देणे, तण नियंत्रण अशा कामांमध्ये शेतकरी व्यस्त होते. त्यात शनिवारी रात्रीपासून सततचा भिज पाऊस सुरू झाला. अनेक भागातील पिकांसाठी म्हणजेच पाण्याचा निचरा होणार्या, उताराच्या जमिनीवरी पिकांना या पावसाचा लाभ होत आहे. परंतु काळ्या कसदार, पाणी तुंबणार्या जमिनीत पिके पिवळी पडत आहेत. तापी काठावरील भागामध्ये ही समस्या अधिक आहे. परंतु इतरत्र मात्र पिके तरारत आहेत. जिल्ह्यात पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित पेरण्या सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने थांबवाव्या लागल्या आहेत. केळी, ऊस, मका, सोयाबीनला लाभसध्याचा भिज पाऊस केळी, ऊस, सोयाबीन, मका या पिकांना लाभदायी आहे. केळीमध्ये भर पावसात खते देण्याचे काम काही भागात हाती घेण्यात आल्याचे दिसून आले. सखल भागात समस्यायातच शेतांमधील सखल भागात मागील काळा तुंबलेले पाणी अद्यापपर्यंत जिरले नव्हते. अशा शेतांमध्ये वाफसा नव्हता. त्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने या सखल भागात पाणी पुन्हा साचू लागले आहे. कपाशी, सोयाबीन, कडधान्य लागवडीची मुदत संपलीआतापर्यंत जिल्हाभरात ८२ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा आठ लाख ४२ हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होईल, असे उद्दीष्ट होते. अजून जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व्हायची राहीली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी वाफसा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु आता कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके लागवड करण्याची किंवा पेरणीची मुदत संपली आहे. तूर, बाजरी ही पिके पेरावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. नुकसान नाही- कृषि विभागहा भिज पाऊस पेरणी झालेल्या पिकांसाठी लाभदायी आहे. फक्त तण नियंत्रण व आंतरमशागतीची कामे खोळंबतील. परंतु पिके खराब होतील, अशी स्थिती नाही. कुठेही नुकसानाची माहिती आलेली नाही. काळ्या जमिनीमध्येही भिज पावसाने नुकसान होत नाही, असा दावा केला.