पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठी भेट

By admin | Published: February 1, 2016 02:10 AM2016-02-01T02:10:54+5:302016-02-01T02:10:54+5:30

आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर बरेच काही बोलले जाते, या मुद्यावरून बरीच टीका होते. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांवर कोसळणारे सर्वात मोठे संकट आहे.

Crop Insurance Scheme: Great gift for farmers | पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठी भेट

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठी भेट

Next

नवी दिल्ली : आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर बरेच काही बोलले जाते, या मुद्यावरून बरीच टीका होते. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मात्र, नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांवर कोसळणारे सर्वात मोठे संकट आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सुरक्षा देणारा एक उपाय आहे आणि तो म्हणजे पीक विमा योजना. या नव्या वर्षात सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या रूपात सर्वांत मोठी भेट दिली आहे.
येत्या दोन वर्षांत ५० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत आणण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे मोदींनी जनतेला संबोधित केले. नवीन वर्षातील ही त्यांची पहिली ‘मन की बात’ होती.
आपल्या भाषणात मोदींनी पीक विमा योजना, खादीचा प्रसार तसेच बेटी बचाओ आदी योजनांवर भर दिला. नवीन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या रूपात एक मोठी भेट दिली आहे. या योजनेचा गवगवा व्हावा.
माझे नाव मोठे व्हावे, यासाठी ही योजना नाही, तर देशातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. येत्या दोन वर्षांत ५० टक्के शेतकऱ्यांना या योजनेशी जोडणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना खादी वापरण्याचे आवाहन केले. महात्मा गांधींना श्रद्धांजली म्हणून खादी वापरा. प्रत्येकाकडे एक तरी खादीचा पोशाख असावा. त्यातून लाखो हातांना काम मिळू शकते, असे आवाहन त्यांनी केले. तरुणाई खादीकडे आकर्षित होते आहे, हे शुभचिन्ह असल्याचेही ते म्हणाले.
या प्रजासत्ताकदिनी हरियाणा आणि गुजरातमध्ये गावातील सर्वात श्क्षिित मुलीला ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. हरियाणात आणखी चांगली गोष्ट म्हणजे, ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला, अशा कुटुंबांना प्रजासत्ताकदिनी विशेष रूपाने निमंत्रित करण्याचा आले. त्यांना पहिल्या पंक्तीत बसवण्यात आले.
‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा एक मोठा संदेश या कृतींमधूून देण्यात आला, असे ते म्हणाले.

Web Title: Crop Insurance Scheme: Great gift for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.