पीक विमा योजनेला दुसर्यांदा मुदतवाढ
By admin | Published: September 4, 2015 10:46 PM2015-09-04T22:46:16+5:302015-09-04T22:46:16+5:30
पुणे: पावसाने पाठ फिरविल्याने अद्यापही बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे खरिपाच्या पीक विमा योजनेसाठी पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Next
प णे: पावसाने पाठ फिरविल्याने अद्यापही बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे खरिपाच्या पीक विमा योजनेसाठी पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षी ३१ जुलै ही या योजनेतील सहभागासाठीची मुदत असते. पेरण्या केल्यानंतर शेतकरी या मुदतीत योजनेत सहभाग घेतात; परंतु यावर्षी पाऊस लांबल्याने सुरुवातीला ७ ऑगस्टपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यातआली होती. मात्र, वाढीव मुदतीच्या काळात व नंतरही पावसाने दडी मारलेली असल्याने आता १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.