भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी १०० एकरवरील पीक हटविले; कार्यक्रमास २ लाख लोक येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:33 AM2022-03-16T07:33:24+5:302022-03-16T07:33:50+5:30

शेतकऱ्यांना एकरी ४६ हजार : कार्यक्रमास २ लाख लोक येणार

Crop on 100 acres removed for Bhagwant Mann's swearing in Punjab | भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी १०० एकरवरील पीक हटविले; कार्यक्रमास २ लाख लोक येणार

भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी १०० एकरवरील पीक हटविले; कार्यक्रमास २ लाख लोक येणार

Next

- बलवंत तक्षक 

चंदीगड : आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे शहीद भगतसिंग यांचे गाव खटखड कलां येथे आज भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी दोन लाख लोक येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी १०० एकरवरील उभे पीक हटविण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना भरपाई म्हणून ४६ हजार रुपये प्रति एकरप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. या कार्यक्रमास येणारे लोक पिवळी पगडी आणि महिला पिवळी ओढणी परिधान करून येणार आहेत. सर्व ९२ आमदार यावेळी हजर राहतील. यातील ८२ आमदार प्रथमच निवडून आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. 

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा  

पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळविण्यासाठी काँग्रेसच्या तीन आमदारांमध्ये स्पर्धा आहे. माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा, माजी प्रदेशाध्यक्ष प्रताप सिंग बाजवा आणि माजी मंत्री अमरिंदर सिंग राजा वडिंग यांचा यात समावेश आहे. 

Web Title: Crop on 100 acres removed for Bhagwant Mann's swearing in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.