विमान, रेल्वे क्षेत्राला 60,000 कोटींचा तोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 02:07 AM2020-10-03T02:07:52+5:302020-10-03T02:13:07+5:30
लॉकडाऊनमधील तीन महिने : मालवाहतुकीत मात्र १५ टक्क्यांची वाढ
हरीश गुप्ता ।
नवी दिल्ली : कोरोना, चाचण्या, नोकऱ्या गमावणे, जीडीपी वृद्धी आदी मुद्दे आणि डेटा शेअर करण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकार काटकसरी झाले आहे. कोरोना काळात रेल्वे आणि विमान उड्डाण या दोन क्षेत्रांतील मोठ्या नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे. या दोन क्षेत्रांत तीन महिन्यांत ६० हजार कोटींचे नुकसान झाले.
18,००० नोकºया गेल्या
राज्यसभेत नागरी उड्डयन आणि शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी खुलासा केला की, खासगी एअरलाईन्स, कार्गो, विमानतळ संचालन व इतर यांचे एकूण महसूल नुकसान
32,252
कोटी आहे. लॉकडाऊनमुळे एअर इंडियालाही
5535
कोटींचे नुकसान झाले. खासगी विमान क्षेत्रात
18,000
नोकºया गेल्या. जहाज, रस्ते परिवहन, उद्योग, दूरसंचार, आयटी, तेल क्षेत्रातील आकड्यांचा खुलासा करण्यात आलेला नाही.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत सांगितलेल्या माहितीनुसार, महसुलात २७,७३१.४१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. २०१९ च्या तुलनेत आॅगस्ट २०२० अखेरपर्यंत १७,५७४.६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय रेल्वेला १२ आॅगस्ट २०२० पर्यंत ३३७१.५० कोटी रुपये परत करावे लागले. या काळात मालवाहतूक महसूल तोटा ६७८५ कोटी होता.