CoronaVirus: ...तर 'या' चार क्षेत्रातल्या कोट्यवधी नोकऱ्यांवर कुऱ्हाड; कोरोनामुळे बेरोजगारी वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:47 PM2020-04-28T16:47:37+5:302020-04-28T16:53:07+5:30

लॉकडाऊनमुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट

crores of jobs in four sectors are in danger due to lockdwon kkg | CoronaVirus: ...तर 'या' चार क्षेत्रातल्या कोट्यवधी नोकऱ्यांवर कुऱ्हाड; कोरोनामुळे बेरोजगारी वाढणार 

CoronaVirus: ...तर 'या' चार क्षेत्रातल्या कोट्यवधी नोकऱ्यांवर कुऱ्हाड; कोरोनामुळे बेरोजगारी वाढणार 

googlenewsNext

मुंबई: कोरोनामुळे एका बाजूला लाखोंचं जीव धोक्यात असताना आता दुसऱ्या बाजूला कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. कोट्यवधींना रोजगार देणाऱ्या चार प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसणार आहे.

हवाई वाहतूक
कोरोनामुळे हवाई वाहतूक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोनामुळे जवळपास जगभरात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात विमान वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या कंपन्यांनी पगार आणि कर्मचारी कपात सुरू केली आहे. लॉकडाऊन वाढल्यास कित्येक कंपन्या बंद होण्याची शक्यता आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट
कोरोनाचा कहर हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रांमध्ये पाहायला मिळत आहे. हवाई वाहतूक बंद, इतरही सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्यानं पंचतारांकित हॉटेल्स बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर स्थानिकांमुळे हॉटेल क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र कोरोनामुळे इतर क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर होणारा परिणाम, त्यातच कोरोना टाळण्यासाठी ठेवावं लागणारं सुरक्षित अंतर यामुळे अनेकजण हॉटेलमध्ये जाणं टाळू शकतात.

लघु आणि मध्यम उद्योग
लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. या वर्गाची क्रयशक्ती फारशी नाही. मात्र त्याचं अर्थव्यवस्थेतलं योगदान मोठं आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका या उद्योगांना बसला आहे. लॉकडाऊन लवकर न संपल्यास या क्षेत्रातील अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे या उद्योगांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यासाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे.

पर्यटन
कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाला आहे. जगभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पर्यंटन ठप्प आहे. लॉकडाऊन संपल्यानंतरही पुढील किमान वर्षभर तरी लोक पर्यटन टाळतील. त्यामुळे या क्षेत्रातील लाखो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. देशातील ३.८ कोटी लोक पर्यटन आणि हॉटेल क्षेत्रात काम करतात.

...तर पुन्हा ‘तशी’ चूक करण्याची हिंमत कोणीही करणार नाही; मनसेची सरकारकडे मागणी

आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक

Web Title: crores of jobs in four sectors are in danger due to lockdwon kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.