राम किशन यांच्या अंत्ययात्रेला नेत्यांची गर्दी, केजरीवाल यांच्याकडून 1 कोटींची मदत

By admin | Published: November 3, 2016 03:18 PM2016-11-03T15:18:27+5:302016-11-03T15:28:21+5:30

भिवानी येथे ग्रेवाल यांच्या अंत्ययात्रेला अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली.

A crowd of leaders from Ram Kishan's funeral, Rs 1 crore from Kejriwal | राम किशन यांच्या अंत्ययात्रेला नेत्यांची गर्दी, केजरीवाल यांच्याकडून 1 कोटींची मदत

राम किशन यांच्या अंत्ययात्रेला नेत्यांची गर्दी, केजरीवाल यांच्याकडून 1 कोटींची मदत

Next

 ऑनलाइन लोकमत

 भिवानी,  दि. 3 -  वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी  माजी सैनिक राम किशन ग्रेवाल यांनी केलेल्या आत्महत्येवरून सलग दुसऱ्या दिवशीही राजकारण सुरू आहे. आज हरयाणातील भिवानी येथे ग्रेवाल यांच्या अंत्ययात्रेला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. दरम्यान, केजरीवाल यांनी ग्रेवाल यांच्या कुटुंबाला दिल्ली सरकारकडून एक कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
वन रँक वन पेन्शनच्या मागणीवरून  आत्महत्या करणारे माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्यावर आज भिवानी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रेवाल यांच्या अंत्यसंस्कारासाठी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासह काँग्रेसचे हरयाणातील नेते दीपेंदर सिंग  हुड्डा,  तृणमुल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांच्यासह इतर नेतेमंडळी आज सकाळी भिवानीत दाखल झाली.  राहुल गांधी, अरविंद केजरीवाल तसेच हरयाणाचे परिवहनमंत्री कृष्ण लाल पवार यांनी ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
(माजी सैनिक आत्महत्या प्रकरण, केजरीवालांची अखेर पोलिसांच्या तावडीतून सुटका)
यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, रणदीप सुरजेवाला आदी नेते उपस्थिती होते. यावेळी काँग्रेस नेते  रणदीप सुरजेवाला यांनी सैनिकांना वन रँक वन पेन्शन दिल्याचा मोदी सरकारच्या दाव्याचा समाचार घेतला. "जर सैनिकांना वन रँक वन पेन्शन देण्यात आली आहे. तर सैनिक विरोध आंदोलन का करत आहेत?  याचाच अर्थ वन रँक वन पेन्शनबाबत मोदी खोटं बोलत आहेत,"असे सुरजेवाला म्हणाले. 
 अरविंद केजरीवाल यांनीही मोदी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. यावेळी केजरीवाल यांनी ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली. तत्पूर्वी, हरयाणाचे परिवहनमंत्री कृष्णलाल पवार यांनी ग्रेवाल कुटुंबीयांची भेट घेऊन 10 लाख रुपये मदत आणि कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.
 
 

Web Title: A crowd of leaders from Ram Kishan's funeral, Rs 1 crore from Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.