अरे बिल आहे की थट्टा?; बटालियन कॅम्पच्या बिलाचा आकडा पाहून जवानांना शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:13 AM2020-08-24T11:13:47+5:302020-08-24T11:20:52+5:30

काश्मीरमधील सीआरपीएफ बटालियनच्या तळाला भरमसाठ बिल

CRPF Battalion in Kashmir Valley gets electricity bill of Rs 1 5 crore | अरे बिल आहे की थट्टा?; बटालियन कॅम्पच्या बिलाचा आकडा पाहून जवानांना शॉक

अरे बिल आहे की थट्टा?; बटालियन कॅम्पच्या बिलाचा आकडा पाहून जवानांना शॉक

Next

श्रीनगर: लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरसमाठ बिलांमुळे सर्वसामान्यांना मोठा शॉक बसला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीदेखील वीज कंपन्यांनी मोठ्या रकमेची बिलं पाठवली. वीज कंपन्यांच्या या मनमानी कारभारामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. आता तर जवानांच्या बटालियनालादेखील वीज कंपन्यांनी शॉक दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियन कॅम्पला तब्बल दीड कोटींचं बिल आलं आहे.

चरारे-शेरिफमध्ये असलेल्या सीआरपीएफच्या १८१ बटालियनला ऊर्जा विकास विभागानं (पीडीडी) दीड कोटी रुपयांचं बिल पाठवलं आहे. या बिलावर १८१ बटालियन, सीआरपीएफ असा उल्लेख आहे. जम्मू-काश्मीरच पोलीस दलाकडून सीआरपीएफचं बिल भरण्यात येतं. मात्र भरमसाठ बिल पाठवण्यात आल्यानं सीआरपीएफच्या तळावरील अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

'बहुधा बिलात एखादी चूक झाली असावी. आम्ही याबद्दल पीडीडीला संपर्क केला. पण शनिवार, रविवारी असल्यानं त्यांना सुट्टी होती,' अशी माहिती सीआरपीएफचे एडीजी झुल्फीकार हुसेन यांनी दिली. सीआरपीफला पाठवण्यात आलेल्या बिलावर १० ऑगस्ट तारीख आहे. २७ ऑगस्टपर्यंत बिल भरण्याची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत पीडीडी झालेला घोळ सोडवेल, अशी अपेक्षा हुसेन यांनी व्यक्त केली.
 

Web Title: CRPF Battalion in Kashmir Valley gets electricity bill of Rs 1 5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज