इस्रोच्या यशासाठी सीआरपीएफ जवानांनी छोटी ड्रील काय केली; मोठे साहेब नाराज झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 11:55 AM2023-08-26T11:55:40+5:302023-08-26T11:57:03+5:30
CRPF Drill Isro Chandrayan 3 Video: पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांनी तिथे उपलब्ध विटा आणि कुंड्यांद्वारे इस्त्रो असे लिहीत एका मिनिटाचे ड्रील केले होते.
इस्रोने २३ ऑगस्टला चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरविले. यापूर्वी भारत आणि रशियाच्या दोन मोहिमा अपयशी ठरल्याने इस्रोच्या यशाचे जगभरातून कौतुक होत आहे. आज पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून थेट बंगळुरुमध्ये दाखल होत शास्त्रज्ञांचे कौतुकही केले. परंतू, इस्रोचे हे यश साजरे करणाऱ्या सीआरपीएफ जवानांना मात्र त्यांच्या बटालियनच्या साहेबाकडून ऐकून घ्यावे लागले आहे.
पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांनी तिथे उपलब्ध विटा आणि कुंड्यांद्वारे इस्त्रो असे लिहीत एका मिनिटाचे ड्रील केले होते. सोशल मीडियावर याची वाहवाही झाली. परंतू, हिच बाब त्यांच्या युनिटच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला खटकली आहे.
182BN CRPF Salutes ISRO🇮🇳... Bharat Chand Par#Chandrayaan3#IndiaOnTheMoon#ISRO#OneMinuteDrill@crpfindia@JKZONECRPF@KOSCRPF@SKORCRPFpic.twitter.com/KEYIVG5DCb
— 182 BN CRPF (@182Bncrpf) August 24, 2023
श्रीनगर ऑपरेशन सेक्टरच्या आयजी कार्यालयातून अशाप्रकारच्या गोष्टी करण्यापूर्वी आमची परवानगी घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच या आदेशांचे सक्तीने पालन करावे अशी तंबीही दिली आहे.
देशभरात आनंदाचे वातावरण होते. सीआरपीएफ जवानांनी तिथे पडलेल्या विटा आणि झाडांच्या कुंड्यांद्वारे कोणताही खर्च न करता हे ड्रील केले होते. तसेच चंद्रयान ३ च्या घोषणा दिल्या होत्या. सोबतच या जवानांनी त्यांच्या बटालियनच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या होत्या. त्याचा 57 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होताच श्रीनगरमध्ये बसलेले वरिष्ठ अधिकारी नाराज झाले आणि त्यांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व युनिटना हे आदेश जारी केले आहेत. चंद्रयान ३ च्या सेलिब्रेशनचा उल्लेख करत भविष्यात श्रीनगर हेडक्वार्टरची परवानगी घ्यावी लागणार असे म्हटले आहे.