आठ किमी पायपीट करून सीआरपीएफच्या जवानांनी वाचवला मुलाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 05:08 PM2019-06-07T17:08:08+5:302019-06-07T17:26:19+5:30

बाहेरच्या शत्रूपासून संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणारे भारतीय लष्कराचे जवान सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठीही सदैव तत्पर असतात.

CRPF found a severely ill 13-year-old boy in Gumodi village | आठ किमी पायपीट करून सीआरपीएफच्या जवानांनी वाचवला मुलाचा जीव

आठ किमी पायपीट करून सीआरपीएफच्या जवानांनी वाचवला मुलाचा जीव

Next

रायपूर - बाहेरच्या शत्रूपासून संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणारे भारतीय लष्कराचे जवान सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठीही सदैव तत्पर असतात. अशीच एक घटना नक्षलप्रभावीत सुकमा जिल्ह्यात समोर आली आहे. येथे गंभीर आजारी असलेल्या एका मुलाचा जीव सीआरपीएफच्या जवानांनी सुमारे आठ किलोमीटर पायपीट करून वाचवला.

नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या छत्तीगडमधील सुकमा जिल्ह्यात गस्त घातल असताना सीआरपीएफच्या जवानांना गुमोडी गावात आजारामुळे प्रकृती चिंताजनक झालेला एक 13 वर्षीय मुलगा दिसला. मुलाची गंभीर अवस्था पाहिल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी या मुलाला खाटेवर बसवून सुमारे आठ किलोमीटर पायपीट करून कोंडासावली येथील कॅम्पमध्ये नेले. तेथे या मुलावर उपचार करण्यात आले. आता त्याची प्रकृती आता स्थिर आहे. 



 

Web Title: CRPF found a severely ill 13-year-old boy in Gumodi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.