रजेवर जाणाऱ्या जवानांना मिळणार MI-17 हेलिकॉप्टरची सुविधा; सीआरपीएफकडून आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 01:08 PM2021-02-27T13:08:08+5:302021-02-27T13:22:13+5:30
crpf jawans going on leave get mi 17 helicopter ferry facility: घातपाताचा धोका ओळखून गृह मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जवानांना एम-१७ हेलिकॉप्टर सेवेचा वापर करता येणार
नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी खास सुविधा देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेले जवान सुट्टीवर जात असताना त्यांना एमआय-१७ विमानांचा वापर करता येईल. (crpf jawans going on leave get mi 17 helicopter ferry facility )
काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी आयईडीचा वापर करतात. त्यामुळे जवानांना धोका असतो. हा धोका लक्षात घेऊन मोदी सरकारनं सीआरपीएफच्या जवानांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या जवानांना सुट्टीवर जायचं असल्यास त्यांना जवळच्या बेसवर एमआय-१७ हेलिकॉप्टरनं सोडण्यात येईल. गृह मंत्रालयानं गुरुवारी हा निर्णय घेतला आहे.
मॅग्नेटिक आयईडी आणि आरसीआयईडी हल्ल्याचा धोका असल्यानं रजेवर जात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना एमआय-१७ हेलिकॉप्टरनं जवळच्या बेसवर सोडण्यात येईल. आठवड्यातील तीन दिवस यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी सीआरपीएफनं जवानांसाठी पत्र जारी केलं आहे. हेलिकॉप्टरची सुविधा मिळवण्यासाठीची माहिती आणि इतर आवश्यक तपशील यामध्ये देण्यात आला असल्याचं गृह मंत्रालयानं आदेशात म्हटलं आहे.