Video : शाब्बास पठ्ठ्यांनो! 6 किमी पायपीट करुन CRPF जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 09:00 AM2020-01-22T09:00:41+5:302020-01-22T09:07:10+5:30

गर्भवती महिलेसाठी जवान देवदूत ठरले आहेत.

CRPF team carry pregnant woman on cot for 6 km through jungles to reach hospital | Video : शाब्बास पठ्ठ्यांनो! 6 किमी पायपीट करुन CRPF जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं!

Video : शाब्बास पठ्ठ्यांनो! 6 किमी पायपीट करुन CRPF जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं!

googlenewsNext
ठळक मुद्देगर्भवती महिलेच्या मदतीसाठी सीआरपीएफचे जवान धावून आले आहेत. एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी 6 किमीची पायपीट केली आहे. छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील पडेडा गावात ही घटना घडली आहे.

बीजापूर - छत्तीसगडमधील गर्भवती महिलेच्या मदतीसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान धावून आले आहेत. सीआरपीएफच्या जवानांनी मंगळवारी (21 जानेवारी) एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी 6 किमीची पायपीट केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील पडेडा गावात ही घटना घडली आहे. गावामध्ये गाडी उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलेला जवानांनी पालखी करून मुख्य रस्त्यापर्यंत पोहचवलं. गाव ते रस्त्यापर्यंत सहा किलोमीटरचे अंतर असल्याने त्यांनी खाटेची पालखी करून  महिलेला नेलं. 

सीआरपीएफची 85 वी बटालियन पडेडाच्या जंगलात गस्त घालत होती. या जवानांनी गावकऱ्यांची विचारपूस केली असता एक महिलेची प्रकृती बिघडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. एका गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या आहेत आणि रुग्णालयात नेण्याची आवश्यकता असल्याचं स्थानिकांनी जवानांना सांगितलं, त्यावेळी जवान वेळ वाया न घालवता तातडीने महिलेच्या मदतीला धावून गेले आणि गर्भवती महिलेसाठी जवान देवदूत ठरले. 

सीआरपीएफची पथकं ही या गावात नेहमी जात असतात. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. गर्भवती महिलेच्या प्रकृतीची माहिती मिळताच कमांडर अविनाश राय फर्स्ट एड एक्सपर्टसह महिलेच्या घरी पोहोचले. तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात आल्या. पडेडा गावात कोणतंही आरोग्य केंद्र नाही. शिवाय रस्ता नसल्याने गाडी किंवा रुग्णवाहिका आणण्याचीही सोय नाही. त्यामुळे महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत आणून बीजापूरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. 

काश्मीर खोऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. काही दिवसांपूर्वी शमीमा नावाची एक गर्भवती महिला गावात अडकली होती. प्रसुतीची वेळ जवळ आल्याने तिला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र ती राहत असलेल्या गावामध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत लष्कराचे 100 जवान आणि 30 स्थानिक लोक कमरेएवढे साचलेले बर्फ तुडवत आले. त्यांनी या महिलेला स्ट्रेचरवर घेऊन रुग्णायल गाठले. तिथे या महिलेने एका मुलाला जन्म दिला. भारतीय लष्कराचे जवान आपले कर्तव्य बजावत असताना अतुलनीय शौर्यासोबतच सर्वसामान्यांना मदत करत माणुसकीही दर्शन घडवत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लष्कराच्या या जवानांचं कौतुक केलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या 

बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली

पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा

मुंबई महापालिकेत लवकरच मेगा भरती, लिपिकांची ८१० पदे भरणार


 

Web Title: CRPF team carry pregnant woman on cot for 6 km through jungles to reach hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.