CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 08:36 AM2020-07-12T08:36:21+5:302020-07-12T08:37:42+5:30
बेरोजगारांना केंद्रीय राखीव पोलीस दला(सीआरपीएफ)मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सगळेच उद्योगधंदे बंद आहे. कंपन्यांचा व्यवसाय सुरू नसल्यानं कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा कुठून हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. त्यातच अनेक कंपन्यांची कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. मात्र अशा बेरोजगारांना केंद्रीय राखीव पोलीस दला(सीआरपीएफ)मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पॅरामेडिकल कर्मचार्यांसह विविध शेकडो रिक्त पदांवर भरती काढली आहे. यासाठी crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवरही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1.42 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. कोणती पदे भरली जाणार आहेत? किती काळ अर्ज करायचा? ही सर्व माहिती याची सर्वच माहिती दिली गेली आहे. तसेच रिक्त जागांसाठी अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही दिल्या जात आहेत.
CRPFमधल्या पदांची माहिती
निरीक्षक (डाएटिशियन) - 1 पोस्ट
उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) - 175 पदे
उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) - 8 पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) - 84 पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) - 5 पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (दंत तंत्रज्ञ) - 4 पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब तंत्रज्ञ) - 64 पदे
सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो वर्कोग्राफी तंत्रज्ञ - 1 पदे
हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / औषध) - 88 पदे
हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ) - 3 पदे
हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस तंत्रज्ञ) - 8 पदे
हेड कॉन्स्टेबल (जुनिअर एक्स-रे सहाय्यक) - 84 पदे
हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) - 5 पदे
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) - 1 पदे
हेड कॉन्स्टेबल (कारभारी) - 3 पद
कॉन्स्टेबल (मसालाची) - 4 पदे
कॉन्स्टेबल (कुक) - 116 पदे
कॉन्स्टेबल (सफाई कामगार) - 121 पदे
कॉन्स्टेबल (धोबी) - 5 पदे
कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) - 3 पदे
कॉन्स्टेबल (टेबल बॉय) - 1 पदे
हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - 3 पदे
एकूण पदांची संख्या - 789
अर्ज माहिती
या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 20 जुलै 2020 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. या पदांनुसार लेखी परीक्षेद्वारे प्रवेश घेण्यात येणार आहे. लेखी चाचणी 20 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येईल.
या शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येणार
नवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपूर, मुजफ्फरपूर, पल्लीपुरम
आवश्यक पात्रता
या रिक्त जागामध्ये अनेक भिन्न पदे आहेत. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादादेखील विविध पदांसाठी वेगवेगळी मागवली गेली आहे. पुढील सूचनांद्वारे आपणास या संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते.