सुरतमध्ये सुरू झाला "क्राइंग क्लब"

By admin | Published: July 6, 2017 01:15 PM2017-07-06T13:15:58+5:302017-07-06T14:08:46+5:30

गुजरातमधील सुरतमध्ये देशातील पहिलं क्राइंग क्लब सुरू झालं आहे.

"Crying Club" started in Surat | सुरतमध्ये सुरू झाला "क्राइंग क्लब"

सुरतमध्ये सुरू झाला "क्राइंग क्लब"

Next

ऑनलाइन लोकमत

सुरत. दि. 6- आरोग्य नीट ठेवण्यासाठी हेल्थ क्लबमध्ये आपण जात असतो. तसंच हसण्याने आरोग्य चांगलं राहत असं बोललं जात असल्याने लाफ्टर क्लब ही संकल्पनासुद्धा उदयास आली. हेल्थ क्लब आणि लाफ्टर क्लबनंतर आता क्राइंग क्लब सुरू झाला आहे. गुजरातमधील सुरतमध्ये देशातील पहिलं क्राइंग क्लब सुरू झालं आहे. या क्राइंग क्लबमध्ये रडण्यासाठी लोक एकत्र येतात. बाळ जन्माला आल्यानंतर ते रडलं तर ते सुदृढ आहे असं डॉक्टर सांगतात म्हणूनच रडणं तब्येतीसाठी उत्तम आहे, असा विचार करून क्राइंग क्लबची स्थापना करण्यात आली आहे. तणाव कमी करण्यासाठी गुजरातमधील लाफ्टर थेरेपिस्ट
कमलेश मसालावाला आणि त्यांच्या मित्रांनी मिळून हेल्थी क्राइंग क्लब सुरू केला आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 8 वाजता क्राइंग क्लब भरविण्यात येतो. या क्राइंग क्लबमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील सहभाग घेत आहेत. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. 
 
क्लबमध्ये जाऊन हसणं सोपं असतं पण रडणं कठीण असतं. पण रडणं हे शरीरासाठी आवश्यक आहे. लोक जशी मोठी होतात तसं त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत जातं. त्यांच्यातील संवेदनशील गोष्टींना लपवून ठेवलं जातं. लपवून ठेवलेल्या या भावना बाहेर काढण्यासाठी रडणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपली रडायची इच्छा असते पण रडू शकत नाही. लोकांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये असलेल्या भावनिक गोष्टींना बाहेर काढण्यासाठी क्राइंग क्लब सुरू केल्याचं संस्थापक कमलेश मसालावाला यांनी सांगितलं आहे. हसण्याचे जसे फायदे होतात तसेच फायदे मनमोकळेपणाने रडण्यानेसुद्धा होतात.त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल आता रडलं पाहिजे तेव्हा रडायला हवं, असंही ते पुढे म्हणाले. आपण किती मजबूत आहोत हे दाखविण्यासाठी लोक त्यांचे अश्रृ नेहमीच लपवितात. असं करण्याची गरज नसते असंही मत कमलेश यांनी व्यक्त केलं आहे. 

आणखी वाचा
 

VIDEO - नाशिकच्या ब्रेन डेड तरुणामुळे 13 जणांना मिळणार नवीन जीवन

GST - सॅनिटरी नॅपकिन्सवरून महिलांचा मोदींवर निशाणा 

थलायवा रजनी सरांनी शूट केला पहिला सेल्फी व्हिडीओ

क्राइंग क्लब सुरू करण्याच्या आमच्या या संकल्पनेला लोकं गांभीर्याने घेतील असं वाटलं नव्हतं. पण अनेक जणांनी क्लबमध्ये नोंदणी केली आहे. या क्लबमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात असलेलं दुःख व्यक्त करेल की नाही यांची खात्री नाही पण त्यांचं क्लबमध्ये येणं महत्त्वाचं आहे. असं या क्लबमधील सदस्य आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मुकुल चोक्सी यांनी सांगितलं आहे. 

 

Web Title: "Crying Club" started in Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.