Coronavirus: चिंता नको? डेल्टा प्लस धोकादायक नाही; CSIR प्रमुखांचा दिलासादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 04:53 PM2021-06-28T16:53:05+5:302021-06-28T16:56:05+5:30

Coronavirus: कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट धोकादायक नसल्याचा दावा डॉ. मांडे यांनी केला आहे.

csir chief dr shekhar mande says delta plus not dangerous do not take tension | Coronavirus: चिंता नको? डेल्टा प्लस धोकादायक नाही; CSIR प्रमुखांचा दिलासादायक दावा

Coronavirus: चिंता नको? डेल्टा प्लस धोकादायक नाही; CSIR प्रमुखांचा दिलासादायक दावा

Next
ठळक मुद्देडेल्टा प्लस धोकादायक नसल्याचा डॉ. शेखर मांडे यांचा दावाडेल्टा प्लस घातक असल्याचे कोणतेही पुरावे नाहीतसीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला पाठवला अहवाल

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसत असली, तरी आता तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातही या प्रकाराचे रुग्ण आढळून आले असून, रत्नागिरीत एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. परंतु, याबाबत एका दिलासादायक आणि चिंतामुक्त करणारी माहिती सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट धोकादायक नसल्याचा दावा डॉ. मांडे यांनी केला आहे. (csir chief dr shekhar mande says delta plus not dangerous do not take tension)

कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटची देशभरातील अनेकांना लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या व्हेरिएंटचा लहान मुलांवर अधिक परिणाम होत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, डेल्टा व्हेरिएंट घातक नसल्याचा दावा सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी केला आहे. तसेच यासंदर्भातील एक अहवाल केंद्र सरकारला पाठवला असल्याचे समजते. 

कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!

लोकांनी डेल्टा प्लसला घाबरू नये

डेल्टा प्लस धोकादायक नाही. त्याचा लहान मुलांवरदेखील परिणाम होत नाही. सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट घातक नसल्याचा अहवाल सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला पाठवला आहे. लोकांनी डेल्टा प्लसला घाबरू नये. डेल्टा प्लस घातक असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेने यासंदर्भात संशोधन केले आहे, अशी माहिती डॉ. मांडे यांनी दिली. तसचे महाराष्ट्रात केवळ दोनच जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडले आहे, असेही ते म्हणाले. ‘झी२४ तास’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. आता आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डेल्टा प्लससोबतच कोरोनाचे किमान चार नवे व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतात, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोना विषाणूच्या चार नव्या व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 

Web Title: csir chief dr shekhar mande says delta plus not dangerous do not take tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.