तलाकबाबत गप्प बसणारेही अपराधी
By admin | Published: April 18, 2017 12:57 AM2017-04-18T00:57:17+5:302017-04-18T00:57:17+5:30
‘ट्रिपल तलाक’ या विषयावर जे काहीही बोलत नाहीत, ते लोक ती प्रथा पाळणाऱ्यांइतकेच अपराधी आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी म्हटले आहे.
लखनौ : ‘ट्रिपल तलाक’ या विषयावर जे काहीही बोलत नाहीत, ते लोक ती प्रथा पाळणाऱ्यांइतकेच अपराधी आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी म्हटले आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण होतानाचे मौन आणि ट्रिपल तलाकवर गप्प बसणे हा गुन्हा समजून राजकीय वर्गाला गुन्हेगार समजायला हवे, त्यांच्या सोबत्यांवर खटले दाखल झाले पाहिजेत. ट्रिपल तलाकला नष्ट करण्याचे आवाहन करताना, त्यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला.
दोन्हींचा काय संबंध?
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना वली रेहमानी म्हणाले की, आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे मला समजत नाही. वस्त्रहरणासारख्या मोठ्या प्रश्नाशी ते तलाकचा संबंध जोडतात. कोणताही शहाणा माणूस असे करणार नाही. ते परिस्थितीकडे दुसऱ्या चष्म्यातून बघत आहेत.
मुस्लिमांतील मागासवर्गीयांना राखीव जागा वाढवून देण्याचे तेलंगण सरकारने रविवारी संमत केलेल्या विधेयकाचे विरोधी पक्ष भाजपाने ‘कचरा’ या शब्दांत सोमवारी वर्णन केले. पक्षाने या विधेयकाच्या निषेधार्थ हैदराबाद आणि तेलंगणात इतरत्र निदर्शनेही केली.
भाजपाचे तेलंगण प्रदेश अध्यक्ष के. लक्ष्मण वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, आम्ही या विधेयकाला प्रखर विरोध करून आंदोलन करणार आहोत. भाजपाचे प्रवक्ते कृष्णा सागर राव म्हणाले की, त्या विधेयकाला ना कायद्याचा आधार आहे ना घटनात्मक पावित्र्य. राखीव जागांसाठी धर्म हा आधार होऊ शकत नाही व कायद्यानेही ते व्यवहार्य नाही. कारण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने राखीव जागांना ५० टक्क्यांचे बंधन घातलेले आहे. या विधेयकाला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ .