‘एआय’वर अंकुश? ‘ट्राय’ची केंद्र सरकारला शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 07:44 AM2023-07-22T07:44:45+5:302023-07-22T07:45:17+5:30
‘ट्राय’ने आपल्या १० पानी शिफारशी गुरुवारी सरकारला सादर केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) नियमन करण्यासाठी एक नियामकीय चौकट तयार करण्याची शिफारस भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरणाने (ट्राय) सरकारला केली आहे.
‘ट्राय’ने आपल्या १० पानी शिफारशी गुरुवारी सरकारला सादर केल्या. त्यात म्हटले आहे की, एआयचे नियमन करण्यासाठी ‘भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता व डाटा प्राधिकरणा’स (एआयडीएआय) लवकरात लवकर एक स्वतंत्र घटनात्मक रूप देण्याची गरज आहे. एआय नियमनासाठी २ संस्था असाव्यात.
एक म्हणजे स्वतंत्र घटनात्मक प्राधिकरण आणि दुसरी बहुविध हितधारकांची संस्था. या संस्था सल्लागार, शिफारसी तसेच नियम बनविण्याचे काम करतील.
नियमन का हवे?
n एआयचा प्रभाव केवळ दूरसंचार क्षेत्रापुरता मर्यादित नाही.
n आरोग्य, वित्त, वाहतूक, शिक्षण आणि कृषी यांसह अनेक क्षेत्रांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.
n त्यासाठी नियामकीय संस्था असणे आवश्यक आहे, असे ‘ट्राय’ने म्हटले.
n एआयच्या नियमनासाठी सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. युरोपीय संघाने अलीकडेच नियम सादर केले.