काश्मीरच्या हंदवाडात संचारबंदी लागू
By admin | Published: September 25, 2016 03:00 AM2016-09-25T03:00:36+5:302016-09-25T03:00:36+5:30
उत्तर काश्मीरच्या हंदवाडात शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात
श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या हंदवाडात शनिवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात ७८ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
श्रीनगरच्या नौहट्टा, खानयार आणि एम. आर. गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्र्बध आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने संचारबंदी लावली आहे. श्रीनगरच्या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध उठवण्यात आले आहेत. काश्मीर खोऱ्यात लोकांना एकत्रित येण्यावर बंदी आहे.
काँग्रेसचे आवाहन
नवी दिल्ली : काश्मीरमधील स्थिती सुधारावी, यासाठी केंद्राने वेगाने पावले उचलावीत, असे आवाहन काँग्रैसने केले आहे.जुलैमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्याप कायम आहे, संचारबंदी, मोबाइलवर निर्बंध आणि जागोजागी सुरक्षा दलाचे जवान यांमुळे काश्मिरी जनतेत भीती व संतापाचे वातावरण आहे. ते बदलणे आवश्यक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. (वृत्तसंस्था/लोकमत न्यूज नेटवर्क)
काश्मिरी पंडितांना हवी स्मार्ट सिटी
आमच्यासाठी काश्मीरमध्ये स्मार्ट सिटी तयार करण्यात यावी, अशी मागणी काश्मिरी पंडितांनी केली आहे. आम्ही आमच्याच देशात निर्वासित झालो आहोत. त्यामुळे आमच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था करण्यात यावी. स्मार्ट सिटीच्या पुढील यादीत काश्मीरमधील नव्या शहराचा समावेश करावा, असे काश्मिरी पंडितांच्या संघटनेचे नेते राम भट यांनी येथे केली.