नोटा बदलणा-या व्यापा-याला ईडीकडून अटक
By admin | Published: December 22, 2016 10:22 AM2016-12-22T10:22:10+5:302016-12-22T10:48:40+5:30
पारसमल लोढा यांनी तब्बल 25 कोटी रकमेच्या जुना नोटा अनधिकृतपणे बदलून घेतल्याचा आरोप आहे
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 22 - प्रसिद्ध व्यापारी पारसमल लोढा यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली आहे. पारसमल लोढा यांनी तब्बल 25 कोटी रकमेच्या जुना नोटा अनधिकृतपणे बदलून घेतल्याचा आरोप आहे. मुंबईत विमानतळावरुन पारसमल लोढा यांना ताब्यात घेण्यात आले.
नोटाबदली प्रकरणात अटक करण्यात आलेले उद्योजक शेखर रेड्डी आणि त्यांचा सहकारी रोहित टंडन यांची चौकशी केल्यानंतर पारसमल लोढा यांचं नाव समोर आलं. रोहित टंडनच्या कार्यालयाची तपासणी केली असता सापडलेले 13 कोटी रुपये पारसमल लोढा यांचे असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.
काही दिवसांपुर्वी लोढा यांच्या मुलीचं राजेशाही थाटात लग्न झालं होतं. या लग्नाला अनेक अधिकारी, राजकारणी आणि बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.
ED arrests Paras Mal Lodha, involved in conversion of more than Rs 25 Crores of old notes to new notes in Shekhar Reddy & Rohit Tandon cases
— ANI (@ANI_news) 22 December 2016