बँका बंद असल्याने ग्राहकांची होणार असुविधा

By admin | Published: March 23, 2016 12:09 AM2016-03-23T00:09:52+5:302016-03-23T00:09:52+5:30

दिलासा : एस.बी.आय. देणार सुविधा

Customers will be inconvenienced because banks are closed | बँका बंद असल्याने ग्राहकांची होणार असुविधा

बँका बंद असल्याने ग्राहकांची होणार असुविधा

Next
लासा : एस.बी.आय. देणार सुविधा
जळगाव : या आठवड्यात बॅँकांना चार दिवस लागून सुट्या असल्याने ग्राहकांकडून होणार्‍या एटीएमचा वापर पाहता ग्राहकांच्या व्यवहारात अडचणी येण्याची चिन्हे आहेत. शहरातील बहुतांश एटीएम मशीन बँकांच्या निगरानीत असल्याने मशीनमधील पैसे संपणे व खराबी झाल्यास ग्राहकांच्या अडचणी होणार आहे. मात्र स्टेट बँकेकडून चारही दिवस एटीएम सुविधा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून तसे नियोजन करण्यात येणार आहे.
या आठवड्यात २४ रोजी धुलिवंदन, २५ रोजी गुड फ्रायडे, २६ रोजी चौथा शनिवार व २७ रोजी रविवार असल्याने सलग चार दिवस बँका बंद असणार आहे. यामुळे ग्राहक व व्यापार्‍यांच्या व्यवहारावर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. सु˜ी असल्याने बहुतांश ग्राहकांचे व्यवहार एटीएम मशीन मधून होतील. मात्र एटीएमचे पैसे संपने, तांत्रिक खराबी होण्याची शक्यता पाहता सु˜ी दरम्यान ग्राहकांच्या अडचणी वाढणार आहे. संभावित अडचणी टाळण्यासाठी ग्राहक व व्यापार्‍यांकडून बुुधवारी बँकामधून आपले व्यवहार आटोपण्यासाठी बँकांमध्ये गर्दी असणार आहे.
लागून येणार्‍या सुट्यामध्ये एटीएमच्या अडचणी येण्याची नेहमीची समस्या असल्याने. बहुतांश बँकातर्फे सु˜ीच्या पूर्वीच एटीएमच्या रोजच्या व्यवहारांची पडताडणी करून त्यानुसार रक्कम भरण्यात येणार आहे. तर काही बँकाच्या एटीएमच्या देखभालीची स्वतंत्र व्यवस्था असल्याने संबंधित कंपनी एटीएमला सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. ग्राहकांची असुविधा टाळण्यासाठीही प्रयत्न असणार असल्याचे बँकाकडून सांगण्यात आले.
एसबीआय देणार सुविधा
सु˜ी दरम्यान उद्भवणार्‍या समस्या सोडविण्यासाठी चारही दिवस स्टेट बँकेच्या (आरबीओ) शाखेतर्फे एटीएम मशीनवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित शाखांच्या कर्मचार्‍यांना आपल्या कार्यक्षेत्रातील एटीएम बाबत माहिती पुरवली जाणार असून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना शहरासह जिल्‘ातील शाखांना देण्यात आली असून. याबाबतचे नियेजन महिनाभरापासून करण्यात आले आहे. ग्राहकांच्या सुविधांकडे लक्ष देण्यात येणार आहे. जिल्‘ात १०२ पेक्षा अधिक एटीमएम मशीन आहेत. त्यापैकी शहरात १३ मशीन आहे. या सर्वच ठिकाणी असुविधा टाळण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आधुनिक सुविधांचा वापर
सु˜ीमध्ये येणार्‍या समस्या टाळण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एसबीआय बडी ॲप्स, सारख्या ऑनलाईन यंत्रणांचा वापर करण्याचे आवाहन स्टेट बँक आरबीओ शाखचे साहाय्यक महाप्रबंधक अशोकुमार गुप्ता यांनी केले आहे.

Web Title: Customers will be inconvenienced because banks are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.