‘सायनाईड’ मोहनला १९ व्या हत्येसाठी जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 06:21 AM2020-02-19T06:21:03+5:302020-02-19T06:21:20+5:30
कर्नाटक; यापूर्वी पाच प्रकरणांत मृत्युदंड
मंगळुरू (कर्नाटक) : विवाहाचे आमिष दाखवून २३ वर्षीय युवतीला २००६ मध्ये कासरगोड जिल्ह्यात सायनाईड देऊन मारणाऱ्या कुख्यात ‘सायनाईड’ मोहनला १९ व्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने एकूण २० महिलांना ‘सायनाईड’ देऊन मारले असल्याचा आरोप असून, या प्रकरणात त्याला २५,००० रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याला आधी झालेल्या शिक्षा भोगल्यानंतर त्याने ही शिक्षा भोगायची आहे, असे सहावे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सईदुन्निसा यांनी निकाल पत्रात म्हटले आहे.
‘सायनाईड’ मोहन हा महिला, युवतींशी मैत्री करून त्यांच्यावर बलात्कार करायचा व नंतर त्यांना सायनाईड देऊन मारायचा. या आरोपाखाली त्याला पाच प्रकरणांत मृत्युदंड व तीन प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. १९ व्या हत्येच्या प्रकरणात त्याने एका कंपनीतील युवतीशी ओळख करून घेतली. तिच्याशी मैत्रीचे नाटक करून विवाह करण्याचे आश्वासन दिले. ३ जानेवारी २००६ रोजी त्याने तिला म्हैसूर येथे नेले व एका लॉजमध्ये ते राहिले. याही प्रकरणात तिला दुसºया दिवशी सकाळी दागिने काढण्यास सांगितले. तो तिला नंतर गोळी खाण्यास दिली.
कोण आहे ‘सायनाईड’ मोहन?
च्केरळमध्ये जन्मलेल्या ‘सायनाईड’ मोहनचे खरे नाव आहे आनंद भास्कर. युवती, महिलांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्याशी मैत्री करायची. नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा, त्यांना सायनाईडची गोळी देऊन मारायचे व दागिने, पैसे लुटायचे, अशी त्याची गुन्ह्याची पद्धत होती.
च्त्याला डिसेंबर २०१३ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा झाली.