‘एम्स’वरील सायबर हल्ला हाँगकाँगमधून? NIA कडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 07:20 AM2022-12-03T07:20:10+5:302022-12-03T07:21:30+5:30

आता डीआरडीओ पुरविणार सर्व्हर

Cyber attack on AIIMS from Hong Kong? Inquiry by NIA | ‘एम्स’वरील सायबर हल्ला हाँगकाँगमधून? NIA कडून चौकशी

‘एम्स’वरील सायबर हल्ला हाँगकाँगमधून? NIA कडून चौकशी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : दिल्लीतीलएम्स रुग्णालयाच्या सर्व्हरवर हाँगकाँगमधून सायबर हल्ला झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याला तपास यंत्रणांनी दुजोरा दिलेला नाही. या हॅकिंग प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. एम्स रुग्णालयात अतिशय महत्त्वाचे राजकीय नेते, व्यक्ती उपचारांसाठी येत असल्याने त्यांची माहिती उघड होऊ नये, यासाठी आता डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) एम्सला सर्व्हर पुरविणार आहे.

एम्स रुग्णालयात ५०हून अधिक सर्व्हर आहेत. सायबर हल्ल्यात हे सर्व्हर हॅक करण्यात आले होते. त्यातील मुख्य सर्व्हर एनआयएने आपल्याबरोबर तपासणीसाठी नेला आहे. या रुग्णालयातील सर्व संगणकांमध्ये आता अँटीव्हायरस टाकण्यात येत असून, त्यांचेही स्कॅनिंग करण्यात येत आहे. डीआरडीओकडून एम्सला पहिल्या टप्प्यात पाच ते दहा सर्व्हर व त्यानंतर इतर सर्व्हर पुरविण्यात येणार आहेत. 

सर्व डेटा पुन्हा उपलब्ध
n सायबर हल्ला व हॅकिंग झाल्यानंतर दिल्ली एम्सचे सर्व्हर २३ नोव्हेंबरपासून बंद होते. पण सात दिवसांनी सर्व डेटा पुन्हा एम्सच्या सर्व्हरवर उपलब्ध झाला आहे. 
n हॅकर्सनी २०० कोटी रुपयांची खंडणी क्रिप्टो चलनात मागितली होती, असेही सांगण्यात येत होते. त्याचा एम्सने इन्कार केला होता. 
n सायबर हल्ल्यामुळे एम्समधील संगणक प्रणालीला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम तेथील वैद्यकीय सेवांवर झाला आहे. 

एम्समधील संगणक, सर्व्हरच्या देखभाल, दुरुस्तीचे काम करणाऱ्यांचीही एनआयए चौकशी करणार आहे. मात्र, सायबर हल्ल्यानंतरही एम्समधील सर्व डेटा सुरक्षित असल्याचा दावा रुग्णालयाच्या सूत्रांनी केला आहे.

Web Title: Cyber attack on AIIMS from Hong Kong? Inquiry by NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.