सिताराम येचुरींना धमकी देणा-याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत

By admin | Published: February 28, 2016 06:44 PM2016-02-28T18:44:46+5:302016-02-28T18:50:32+5:30

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते सीताराम येचुरी यांना फोनवरुन धमक्या देणा-याचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस आता सायबर सेलची मदत घेणार आहे

Cyber ​​cell help to find out threat to Sitaram Yechury | सिताराम येचुरींना धमकी देणा-याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत

सिताराम येचुरींना धमकी देणा-याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत

Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि.२८ -  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते सीताराम येचुरी यांना फोनवरुन धमक्या देणा-याचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस आता सायबर सेलची मदत घेणार आहे. सीताराम येचुरी यांनी काही दिवसापुर्वी धमक्या देणारे फोन आणि मेसेज आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. 
 
धमकी देणारा संसदेत देवी दुर्गाबद्दल चुकीच्या गोष्टी बोलले असल्याचा आरोप फोनवरुन करत असल्याची माहिती सीताराम येचुरी यांनी दिली आहे. सीताराम येचुरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून ज्या नंबरवरुन धमक्या आल्या आहेत ते नंबर पोलिसांकडे दिले आहेत. आम्ही सध्या तपास करत आहोत, कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती डीसीपी जतीन नरवाल यांनी दिली आहे. 
 
धमकी देणारा जे काही बोलत आहे तो सर्व मुर्खपणा आहे. मी असं काहीही बोललेलो नाही. देवी दुर्गाचा एकदाही मी उच्चार केलेला नाही. युट्यूबवर माझ भाषण उपलब्ध आहे. माझ्याविरोधात मुद्दाम कोणतरी कट रचत असल्याचा आरोप सीताराम येचुरी यांनी कोणाचंही नाव न घेता केला आहे. याअगोदरही १५ जानेवारीला जेएनयू प्रकरणावरुन धमकीचे फोन आले होते ज्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार केली होती. मात्र पोलिसांना याप्रकरणी काहीत हाती लागलं नव्हत.
 

Web Title: Cyber ​​cell help to find out threat to Sitaram Yechury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.