भारतीय पुरुषांमधील वासनेमुळे सायबर पॉर्न फोफावला - सीबीआय
By Admin | Published: October 9, 2015 04:23 PM2015-10-09T16:23:21+5:302015-10-09T16:29:18+5:30
भारतातील पुरुषांमधील वासनेमुळेच हिंसक सायबर पॉर्नवर बंदी घालणे कठीण असल्याचे अजब तर्कट सीबीआयने सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - भारतातील पुरुषांमधील वासनेमुळेच हिंसक सायबर पॉर्नवर फोफावत आहे असे तर्कट सीबीआयने सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे. राज्याच्या सीमांमध्ये अडकलेली पोलिस यंत्रणा सायबर सेक्स क्राईमच्या गुन्ह्यांचा तपास करु शकत नाही, यासाठी सीबीआयसारखी केंद्रीय तपास यंत्रणांच अशा गुन्ह्याचा तपास करु शकते असेही सीबीआयने सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे.
पॉर्नसंदर्भात सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत गुरुवाती सीबीआयने कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. 'भारतीय पुरुषांमधील वासनेमुळेच सायबर पॉर्न भारतात वेगाने पसरत आहे, बलात्कार व सामूहिक बलात्काराच्या घटनांमधून एखादा पुरुष महिलेसोबत किती अमानवीय कृत्य करु शकतो हे दिसते. अशा घटनांचे चित्रीकरण करुन ते इंटरनेटवर टाकून अन्य पुरुषांनाही यासाठी चालना देण्याचे काम होत आहे असे सीबीआयने प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे.
सायबर पॉर्नमधील बहुसंख्य गुन्हेगार हे देशाबाहेरच आहेत. तुम्ही एका साईटवर बंदी टाकली तर तेच व्हिडीओ लगेच दुस-या साईट्सवर अपलोड होतात. अशा स्थितीत राज्य पोलिसांना पॉर्न संदर्भातील गुन्ह्यांचा तपास करणे अवघड होते. सीबीआयला परदेशातील गुन्ह्यांचा तपास करण्याचा प्रर्दीघ अनुभव आहे याकडे सीबीआयने कोर्टाचे लक्ष वेधले.
अमेरिकेप्रमाणेच सीबीआयमधील सायबर क्राईममधील तज्ज्ञ अधिका-यांची गुगल, युट्यूब, फेसबुक, व्हॉट्स अॅपयासारख्या कंपन्यांमध्ये नेमणूक केली पाहिजे असे सीबीआयने नमूद केले. या माध्यमातून तपास आणखी वेगाने होऊ शकेल असा दावाही सीबीआयने केला आहे.