Cyclone Amphan: ओडिशामध्ये ‘अम्फान’ चक्रीवादळाच्या प्रकोपाला सुरुवात; अनेक झाडं कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:02 AM2020-05-20T10:02:16+5:302020-05-20T10:03:05+5:30
cyclone amphan: पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या सर्वाधिक धोका असणाऱ्या भागांना प्रशासनाकडून खाली करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली – चक्रीवादळ अम्फान आज दुपारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये पोहोचेल. ओडिशामध्ये जोरदार पाऊस आणि वार्यामुळे चक्रीवादळाची गती थोडी कमकुवत झाली आहे ही दिलासाची बाब आहे. सकाळपासूनच ओडिशाच्या पारादीपमध्ये जोरदार वारा सुटला आहे. याठिकाणी प्रति तास ८२ किमी वेगाने जोरदार वारे वाहत आहेत.
पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या सर्वाधिक धोका असणाऱ्या भागांना प्रशासनाकडून खाली करण्यात आलं आहे. महाचक्रीवादळ वादळ अम्फान १८० किमी / ताशी वेगाने पुढे येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत 'अम्फान' सुपर चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओरिसा किनाऱ्यावर पोहोचेल. सध्या सुपर चक्रीवादळ अम्फान पश्चिम बंगालच्या दिशेने १८० किमी / ताशी वेगाने पुढे येत आहे.
Odisha: Fire Services team clearing road blockage near R&B office in Bhadrak to facilitate the movement of vehicles, essential commodities, and emergency service personnel. #CycloneAmphanpic.twitter.com/jE2P9eAtqz
— ANI (@ANI) May 20, 2020
दोन्ही राज्ये सतर्कतेवर आहेत. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ४० एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने पश्चिम बंगालसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे आणि कोलकाता, हुगळी, हावडा, दक्षिण आणि उत्तर २४ परगना तसेच पूर्व मिदनापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते असा इशारा दिला आहे.
#WATCH High tide at Digha in East Medinipur, as #CycloneAmphan is expected to make landfall today. #WestBengal
— ANI (@ANI) May 20, 2020
(Source: NDRF) pic.twitter.com/QMYTR0IYFS
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपुरात जोरदार वारे वाहू लागले आहेत आणि समुद्रामध्ये भरती वाढली आहे. चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून रोखले गेले आहे. आजूबाजूचा परिसर पूर्णपणे रिकामी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे की, बऱ्याच ठिकाणी रेल्वे व रोड वाहतूक विस्कळीत होऊ शकतात, वीज व दळणवळणाचे खांब उखडले जाऊ शकतात आणि सर्व प्रकारच्या 'कच्च्या' घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. पिके, फळबागा आणि बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
#WATCH Digha in East Medinipur witnesses high tide and strong winds as #CycloneAmphan is expected to make landfall today. #WestBengalpic.twitter.com/sxmX9Jt3Yw
— ANI (@ANI) May 20, 2020
सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महा चक्रीवादळात उद्भवलेल्या कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे संभाषण झाले आहे. कमीत कमी ३ लाख लोकांना किनारपट्टीवरून हटवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे.