Cyclone Amphan: पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 04:54 PM2020-05-20T16:54:35+5:302020-05-20T17:29:49+5:30

अम्फान चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगत असणाऱ्या घरांच मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे.

Cyclone Amphan: Cyclone Amphan has finally hit the coast of West Bengal mac | Cyclone Amphan: पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त

Cyclone Amphan: पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त

Next

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'अम्फान सुपर सायक्लोन' हे चक्रीवादळ अखेर पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगत असणारे अनेक घरं  जमीनदोस्त झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याच पार्श्वभूमीवर अम्फान चक्रीवादळाचा धोका असणाऱ्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते.

पश्चिम बंगालच्या दीघा आणि ओडिशाच्या पारदीप किनाऱ्यावर बुधवारी सकाळपासून जोरदार वाऱ्यासहीत पाऊस सुरू आहे. मात्र आता अम्फाननं भयंकर वेग घेतला आहे. पश्चिम बंगालच्या दीघा आणि ओडिशाच्या पारदीप किनाऱ्यावर अम्फान धकडल्यानंतर किनाऱ्यालगत असणाऱ्या घरांच मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच रस्त्यावरील विद्युत तार,  झाडं उखडून पडले आहेत. दूपारी २.३० वाजताच्या सुमारास सुरु झालेलं हे च्रकीवादळ तब्बल ४ तास सुरु राहिल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

अम्फान सुपर सायक्लोनच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलालाही अलर्ट करण्यात आलं आहे. तर आतापर्यंत ३ लाख नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. तसेच ओडिशामधील जवळपास १.५ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं असल्याचे ओडिशा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.