Cyclone Amphan Updates: अम्फानचे थैमान सुरू; 4 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी झाडे, भिंती कोसळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 09:27 PM2020-05-20T21:27:25+5:302020-05-20T21:39:30+5:30
अम्फान चक्रीवादळाने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. यापैकी दोन जण पश्चिम बंगालमधील आहेत. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील मिनखा येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेल्या अंगावर झाड पडल्याचे समजते. तर हावडा येथे एक टिन शेड तुटले आणि त्याच्या चपाट्यात आल्याने एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
भूवनेश्वर :पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांत सुपर सायक्लोन अम्फान धडकले आहे. बंगाल आणि ओडिशामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. या दोन्हीही राज्यांतील अनेक भागांत झाडे आणि भिंती पडल्या आहेत. या वादळामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समते.
अम्फान चक्रीवादळाने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. यापैकी दोन जण पश्चिम बंगालमधील आहेत. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील मिनखा येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेल्या अंगावर झाड पडल्याचे समजते. तर हावडा येथे एक टिन शेड तुटले आणि त्याच्या चपाट्यात आल्याने एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
चीनची धमकी! आता अमेरिकेने परिणाम भोगायला तयार रहावे
#WATCH West Bengal: Rainfall and heavy winds in North 24 Parganas as #CycloneAmphan made landfall. pic.twitter.com/noHLgqJhPX
— ANI (@ANI) May 20, 2020
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, कोलकात्यासह पश्चिम बंगालचा एक मोठा भागाचे अम्फान वादळामुळे नुकसान झाले आहे. 130 ते 185 किमी/तास वेगाने येथे हवा वाहत आहे. यामुळे मोठे मुकसान होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी सर्वप्रकारची मदत करणे आवश्यक आहे.
जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप
हवामान खात्यानुसार, कोलकात्याहून जाताना या चक्रीवादळाचा वेग 113 किमी प्रति तास एवढा होता. गेल्या काही वर्षांत कोलकात्यात, असे पहिल्यांदाच झाले आहे. तसेच, हावडा येथे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार बाबुल सुप्रियो यांच्या घराजवळील भिंत कोसळ्याचेही समजते.
अम्फान चक्रीवादळाचे लँडफॉल -
एनडीआरएफचे डीजी एस. एन प्रधान यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळाचे लँडफॉल सुरू झाले आहे. पुढी काही तास हे सुरू राहील. जवळपास दोन ते तीन तास लँडफॉल चालेल. परिस्थितीवर आमचे पूर्णपणे लक्ष आहे. लँडफॉलनंतर आमचे काम सुरू होते, असे त्यांनी म्हटले होते.
काँग्रेसची आमदार, पण भाजपाची 'मित्र'?; थेट प्रियंका गांधींनाच केला प्रतिप्रश्न
Super Cyclone #Amphan is crossing West Bengal Coast between Digha&Hatiya close to Sunderban. The forward sector of wall clouds has entered into the land. Landfall process will continue and take 2-3 hours to complete: IMD in a bulletin issued at 4:30 pm; Visuals from Digha pic.twitter.com/DfSq4kVC17
— ANI (@ANI) May 20, 2020
14 लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवले -
ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर सध्या शांतता पसरली आहे. कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच या वादळाच्या शक्यतेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या लोकांना सातत्याने सावध राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. तर 14 लाखहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफचे चमूही कामाला लागले आहेत.