Cyclone Biparjoy : बिपरजॉयने बदलला मार्ग, गुजरातच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकले, IMD ने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 08:36 AM2023-06-12T08:36:18+5:302023-06-12T08:37:24+5:30
बिपरजॉयने कालपासून जोर पकडला आहे.
बिपरजॉयने कालपासून पुन्हा जोर पकडला आहे, पाकिस्तानच्या दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने जात आहे. १५ जून रोजी कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीदरम्यान 'बिपरजॉय' या तीव्र चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम्स किनारी भागात तैनात करत आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये निवारा केंद्रे उभारणार आहेत.
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
हे वादळ किनारी भागातील जमिनीवर कोठे धडकणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. कच्छ, जामनगर, मोरबी, गिर सोमनाथ, पोरबंदर आणि देवभूमी द्वारका या जिल्ह्यांना १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग १५० किलोमीटरमुळे चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
बिपरजॉय वादळाने सुरुवातीपासनच जोर पकडला असून, रविवारी संध्याकाळी मुंबईच्या पश्चिमेला सुमारे ५४० किमी अंतरावर होते. रविवारी संध्याकाळी चक्रीवादळ बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, "१४ जूनच्या सकाळपर्यंत ते जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची, नंतर उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची आणि १५ जूनच्या दुपारपर्यंत गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान सौराष्ट्र आणि सौराष्ट्र ओलांडण्याची शक्यता आहे. .
१४ आणि १५ जून रोजी कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आयएमडीने दिला आहे. IMD ने बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, १४ जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार आणि १५ जून रोजी प्रभावित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, पूर्व मध्य अरबी समुद्रावर सक्रिय असलेला 'बिपरजॉय' रविवारी दुपारी ४.३० वाजता आठ किलोमीटर वेगाने उत्तर-पूर्वेकडे सरकले.